नांदेड(प्रतिनिधी)-टायरबोर्डजवळ, गंगानगर येथे विक्रीसाठी ठेवलेला 24.610 किलो ग्रॅम गांजा स्थानिक गुन्हा शाखेने पकडला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार या गांजाची किंमत 4 लाख 92 हजार 200 रुपये आहे. काही विद्यवान पत्रकारांनी या गांजाची किंमत 8 लाख रुपये लिहिले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडे यांना शहरात गांजा विक्री करणाऱ्याविरुध्द कार्यवाही करण्याची सुचना दिली. त्यानुसार 26 जुलै रोजी राजपत्रीत अधिकारी नायब तहसीलदार के.बी. डांगे, पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, शासकीय पंच आणि सहाय्यक पोलीस निरिक्षक संंतोष शेकडे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, संभाजी मुंडे, किशन मुळे, मोतीराम पवार, राजू बोधगिरे, शेख इजराहील, अनिल बिरादार, अकबर पठाण, शिवाजी बिचकुले, किरण बाबर, दादाराव श्रीरामे, हनुमानसिंह ठाकूर असे सर्व जण गंगानगर टायरबोर्ड येथे पोहचले. तेथील एका घरात छापा मारला असता ते अहेमद खान अनवर खान (28) याचे आहे. थे पोलीसांनी 24.610 किलो ग्रॅम गांजा जप्त केला. त्या गांजाची किंमत 4 लाख 92 हजार 200 रुपये असल्याचे प्रेसनोटमध्ये नमुद करण्यात आले आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे आदींनी स्थानिक गुन्हा शाखेचे कौतुक केले आहे. पकडलेल्या अहेमद खान अनवर खान विरुध्द अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.