नांदेड(प्रतिनिधी)-कामठा ते मालेगाव रस्त्यावर उमरी पाटी जवळ एक वाहन पकडून अर्धापूर पोलीसांनी त्यात बळजबरीने लपवून नेत असलेले गोवंश जातीची तीन जनावरे जप्त केली आहेत. या प्रकरणी टॅम्पो चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्धापूर येथील पोलीस उपनिरिक्षक सुरेश भगवानराव भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 जुलैच्या दुपारी 3 वाजेच्यासुमारास कामठा ते मालेगाव रस्त्यावरील उमरी पाटीजवळ त्यांनी एम.एच.20 बी.ई.6110 ही गाडी थांबवली त्यामध्ये तीन गोवंश जातीची जनावरे 10 हजार रुपये किंमतीची जनावरांना क्षती होईल अशा उद्देशाने डांबून ठेवली होती. पोलीसांनी 2 लाख रुपयांचे वाहन सुध्दा जप्त केले आहे. या प्रकरणी टॅम्पो चालक शेख निसार शेख अब्दुल साब (23) रा.देगलूरनाका यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 399/2024 दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदा गोणारर अधिक तपास करीत आहेत.

Post Views: 279