नांदेड(प्रतिनिधी)-प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचाराचा कळस होतो याच्या चर्चा खुप ऐकल्या, अनुभवल्या पण कोणालाच काही करता येत नाही. कारण त्यांची कामे तेथे अडकलेली असतात. पण आज एक मोटार ड्रायव्हींग स्कुलने हिम्मत केली आणि सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक 9 हजारांची लाच घेतल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला ताब्यात घेतले आहे.
आज 25 जुलै रोजी गुरुकृपा मोटार ड्रायव्हींग स्कुलच्यावतीने त्यांचे ऑफीस बॉय यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरुकृपाा मोटार ड्रायव्हींग स्कुलमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या 20 प्रशिक्षणार्थी चालकांना वाहन चालक तपासणीमध्ये अनुउत्तीर्ण करण्यात आले होते. त्या अनुउत्तीर्ण चालकांना पास करण्यासाठी नांदेड प्रादेशिक परिवहन विभागातील सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक (वर्ग-2) भुषण जवाहर राठोड याने दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर 9 हजार रुपये लाच स्विकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भुषण जवाहर राठोडला ताब्यात घेतले. वृत्तलिहिपर्यंत या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक भुषण जवाहर राठोड (34) यांनी यांचे आणि एका पयसी सेंटर माकाचे काही महिन्यापुर्वी भांडण झाले होते. त्यात भाग्यनगर पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. कोणताही नागरीक प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेला तर त्याच्या कामातील छोट्या-छोट्या त्रुटया दाखवून त्या ठिकाणी त्याला लुटले जाते. या कामाला सहज स्वरुप यावे म्हणून बरेच लोक प्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंटचे काम करतात. त्या एजंटांना सर्वत्रुट्यांबद्दल माहिती असते. तरीपण पुन्हा त्यात त्रुट्या काढल्या जातात आणि नागरीकांची अडवणूक होत असते. गुरुकृपा ड्रायव्हींग स्कुलने केलेली तक्रार लक्षात घेता जनतेने यातून शिक्षकले पाहिजे आणि कोणी लाच मागत असेल तर त्या संदर्भाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी गाठ त्या लाच मागणाऱ्याशी करून द्यायला हवी.
2 thoughts on “सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक अडकला 9 हजाराच्या लाच जाळ्यात”