नांदेड(प्रतिनिधी)-मौजे भोसी ता.भोकर येथील एक घरफोडून चोरट्यांनी 4 लाख 85 हजार रुपयंाचा ऐवज चोरला. तसेच धर्माबादच्या फुलेनगर येथून एका घरात घुसून चोरट्यांनी चाकूच्या धाकावर 68 हजारांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. हिमायतनगर येथे एक दुकान फोडून चोरट्यांनी त्यातून 36 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
सचिन दिपकराव कल्याणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे मौजे भोसी येथे घर आहे. दि.23 जुलैच्या रात्री 10 ते 24 जुलैच्या पहाटे दरम्यान त्यांच्या घरातील रुमचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि कपाटाचे लॉकर तोडून त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा एकूण 4 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भोकर पोलीसांनी हा घटनाक्रम भारतीय न्याय संहितेतील कलमानुसार गुन्हा क्रमांक 252/2024 प्रमाणे दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक कल्पना राठोड अधिक तपास करीत आहेत.
अरुणा रमेश श्वाकुलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फुलेनगर धर्माबाद येथे त्यांचे घर आहे. दि.24 जुलैच्या रात्री 2 वाजेच्यासुमारास कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम सेच ोाईल असा 68 हजार रुपयांचा ऐवज चोरी करून पळून जात असतांना त्या आणि त्यांच्या सासु चोरट्यांसमोर आल्या असतांना त्यांना चाकुचा धाक दाखवून चोरटे पळून गेले आहेत. धर्माबाद पोलीसांनी भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा क्रमांक 215/2024 दाखल केला आहे. धर्माबादचे पोलीस निरिक्षक रोकडे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
सिध्देश्र्वर शंकरराव कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 जुलैच्या रात्री 10 ते 21 जुलैच्या सकाळी 7 वाजेदरम्यान जनता कॉलनी हिमायतनगर येथील त्यांचे किराणा दुकान फोडून चोरट्यांनी त्यातून सोयाबीन तेलाचे 24 पॅकीट, एम एम्लीफायर, तीन माईक आणि रोख रक्कम असा 36 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 192/2024 दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कोमल कागणे अधिक तपास करीत आहेत.