महावरकरांना मिळाली मनपसंद नियुक्ती;इतर दोन विशेष पोलीस महानिरीक्षकांना अदला-बदली

नांदेड,(प्रतिनिधी)- कॅट न्यायालया कडून स्थगिती घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी आपल्या पसंदीची नियुक्ती मिळवण्यात यश मिळवले आहे.आता पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांना स्वतःचा मार्ग सुकर झाला आहे.गृह विभागाने आणखीन दोन विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या जागा अदला बदली केल्या आहेत.

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांची त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्या अगोदरच बदली करून राज्याच्या गृह विभागाने त्यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे पाठवले होते.तेव्हा अनेक संवेदनशील करणे दाखवत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई (कॅट) येथून आपल्या बदलीला स्थगिती मिळवली होती,त्यामुळे नांदेडला आलेले शहाजी उमाप यांना परत जावे लागले होते.पण कॅट न्यायालयात उत्तर देताना सरकारने मांडणी केली होती की,आमच्या कडे काही पदे रिकामी आहेत.त्यातील एक पद सरकार महावरकर यांना देण्यास तयार आहे.तेव्हा महावरकर यांनी सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड पुणे हे पद मिळवण्याची इच्छा दाखवली.पहिल्या बदलीत पण पुणे आणि दुसऱ्या बदलीत सुद्धा पुणे तेव्हा कॅट न्यायालयात अर्ज दाखल करतानाच्या संवेदना कोठे गेल्या, अस.

महावरकर यांच्या सोबतच सरकारने महिला व बाल अत्याचार विभाग मुबई येथील विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांना तेथून काढून नागरी हक्क संरक्षण विभाग मुबई येथे पाठवले आहे.सुहास वारके हे आपल्या पोलीस जीवनाच्या सुरुवातीला किनवट पोलीस उप विभागात सहायक पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत होते. नागरी हक्क संरक्षण विभाग मुबई येथील विशेष पोलीस महानिरीक्षक अश्व् ती दोरजे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक महिला व बाल अत्याचार विभाग मुबई येथे पाठवून त्यांची अदला बदली केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!