नांदेड(प्रतिनिधी)-बिलालनगर येथे बंद घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 90 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच फुलवळ ता.कंधार शिवारात सिमेंट गोडाऊनमधून चोरट्यांनी 42 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरला आहे.
मोहम्मद कलीम मोहम्मद नवाज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 जुलैच्या मध्यरात्रीनंतर ते 13 जुलैच्या दुपारी 12 वाजेपर्यंत ते आपल्या बहिणीच्या घरी झोपण्यासाठी गेले असतांना त्यांच्या घराच्या समोरील भिंतीवरून आत व्हऱ्ड्यांत प्रवेश करून दोन कक्षाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे व रोख 95 हजार रुपये असा एकूण 1 लाख 90 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा प्रकार भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा क्रमांक 650/2024 प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कदम हे करीत आहेत.
शादुल नुरखान पठाण हे हल्ली एमआयडीसी फुलवळ ता.कंधार येथे राहतात. त्या ठिकाणी जे.के.अल्युमिनियम कंपनीचे सिमेंट गोडाऊन आहे. दि.23 जुलै रोजी रात्री ते आपल्या मित्रांसह गोडाऊनमध्य झोपले असतांना दुाकीवर आलेल्या चोरट्यांनी गोडाऊनच्या खिडकीतून आत प्रवेश केला आणि दोन मोबाईल 17 हजार रुपये किंमतीचे आणि 25 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. कंधार पोलीसांनी हा घटनाक्रम गुन्हा क्रमांक 239/2024 प्रमाणे दाखल केला असून पोलीस अंमलदार काळे अधिक तपास करीत आहेत.