नांदेड(प्रतिनिधी)-जवाहरनगर तुप्पा येथे एका घरातून चोरट्यांनी 2 लाख 67 हजार 250 रुपयांचा ऐवज चोरला आहे. विशालनगर येथील गणपती मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी 50 हजार रुपये चोरले आहेत. एका ट्रकचे दोन टायर 60 हजार रुपये किंमतीचे चोरट्यांनी लांबवले आहेत. हा प्रकार धनेगाव येथे घडला.
कपिल अण्णाराव गच्चे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 जुलै च्या रात्री 11 ते 21 जुलैच्या पहाटे 4 वाजेदरम्यान जवाहरनगर येथील त्यांच्या घराच्या मुख्य गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि त्यांनी झोपलेल्या खोलीच्या बाजूच्या रूममधील पेटीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व 20 हजार रूपये रोख रक्कम असा एकूण 2 लाख 67 हजार 250 रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी हा प्रकार गुन्हा क्र. 649/2024 नुसार नोंदविला असून सहायक पोलीस निरीक्षक कांबळे अधिक तपास करीत आहेत.
शंकर विश्वनाथ नाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 जुलै रोजी मध्यरात्रीनंतर 2 ते 2.30 वाजेदरम्यान विशालनगर येथील चिंतामणी गणपती मंदिराची खिडकी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि मंदिरातील दानपेट्या फोडून त्यातील अंदाजे 50 हजार रूपये रोख रक्कम ून नेली आहे. भाग्यगर पोलिसांनी हा घटनाक्रम गुन्हा क्र. 355/2024 नुसार दाखल केला तपास पोलीस अंमलदार हुंड करीत आहेत.
लक्ष्मण अमृतराव नागसाखरे या वाहतुक व्यवसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार 21 जुलै 2024 च्या मध्यरात्री ते 22 जुलैच्या सकाळी 8 वाजेदरम्यान व्यंकटेश मोटार गॅरेज धनेगाव येथे त्यांच्या उभ्यास असलेल्या ट्रक क्र. एम.एच. 32 क्यू 9600 च्या पाठीमागील बाजूचे 2 टायर डिक्ससह ज्यांची किंमत 60 हजार रूपये आहे, अज्ञात चोरट्यांनी चोरले आहेत. नांदेड ग्रामीण पोलिसांनी हा प्रकार गुन्हा क्र. 647/2024 नुसार दाखल केला आहे. पोलीस अंमलदार माने अधिक तपास करीत आहेत.