नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेत आता शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी सदस्य होवू शकतात. भारत सरकारच्या पेन्शन डिपार्टमेंट विभागातील उपसचिव विमल यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झालेल्या पत्रानंतर दिसते आहे.
सन 1966, 1970 आणि 1980 या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये काम करण्यासाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बंदी करण्यात आली होती. पण या निर्णयांवर घेतलेल्या पुर्नर निरिक्षणामध्ये 9 जुलै 2024 रोजी ही बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे भारत सरकार, राज्य सरकार यांच्या सोबत काम करणाऱ्या कोणत्याही शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्याला आता राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सदस्य होता येईल. यामध्ये त्या-त्या विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक आहे असे नमुद केले आहे. ही बंदी गणवेशधारी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज लागू असेल. पण गणवेश न धारण करणारे केंद्र किंवा राज्य सरकारचे अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होवू शकतात असे या पत्रावरुन दिसते.