नांदेड -चीनमध्ये होणाऱ्या युनिव्हर्सिटी आर्चरी क्रीडा स्पर्धेसाठी तेजबीरसिंग जहागीरदार यांची निवड झाली यांच्या निवडी बद्दल सत्कार करताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी
चीनमध्ये टाईपाई येथे होणाऱ्या दुसऱ्या एशियन यूनिवर्सिटी आर्चरी क्रीडा स्पर्धा 2024 साठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील खेळाडू तेजबिरसिंघ जहागीरदार यांची निवड झाली आहे
स्पर्धा दिनांक 30 ऑगस्ट ते1 सप्टेंबर 2024 दरम्यान चीन येथील टाईपाई येथे संपन्न होणार असून कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भुवनेश्वर येथे दिनांक 12 ते 14 जुलै दरम्यान निवड चाचणी घेण्यात आली होती
यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे तेजबीरसिंग जहागीरदार यांनी सहभाग घेतला होता आर्चरी कंपाऊंड या खेळामध्ये अचूक निशाणा साधत उत्तम कामगिरी करून तेजबीरसिंग जहागीरदार यांची पुढील स्पर्धेसाठी निवड झाली आहे या निवडी बाबतचे पत्र कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भुवनेश्वर यांनी विद्यापीठात दिले आहे या यशामागे प्रशिक्षक चंद्रकांत इलत सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.