नांदेड(प्रतिनिधी)-वृत्तपत्र आणि प्रसार माध्यमांचे मालक यांच्यामुळे शुन्य स्तरावर काम करणारे पत्रकार वंचित बहुजन आघाडीच्या खऱ्या मुद्यांना प्रसारीत करत नाहीत असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
आज नांदेडमध्ये आरक्षण बचाव यात्रेच्या पुर्व तयारीसाठी ओबीसी समाजाच्या बैठकीत ऍड. प्रकाश आंबेडकर हे आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना पत्रकारांवर आरोप केला की, तुम्ही तुमच्या मालकांमुळे वंचित बहुजन आघाडीच्या बऱ्याच आणि खऱ्या मुद्यांना कधीच प्रसिध्दी देत नाही. हे प्रसार माध्यमांमध्ये पसरलेले दुर्देव आहे. याचा संदर्भ सांगतांना ऍड.आंबेडकर म्हणाले वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीमध्ये 1 कोटी पेक्षा आसपास मतदान प्राप्त केले आहे. तरी कोणताही राजकीय पक्ष याची दखल घेत नाही आणि तुम्ही अर्थात पत्रकार मलाच विचारता आहात की, निवडणुक लढवितांना आपल्या पक्षाच्या वाढीसाठी काही तरी ऍडजसमेंट करा. ऍड.आंबेडकर म्हणाले की, हाच प्रश्न तुम्ही कधी कॉंगे्रस, राष्ट्रवादी या पक्षांना विचारला काय? की, वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव मतदानाच्या माध्यमातून जो दिसतो आहे त्या्राणे राजकीय पक्षांनी वंचित बहुजन आघाडीच्या मागणीप्रमाणे त्यांनाा उमेदवारी द्यायला हवी. सर ऍरनॉल्ड म्हणत होते की, सत्ताधिशांना जे आवडत नाही तेच छापणे खरी पत्रकारीता आहे. इतर बातम्या फक्त संबंध राखण्याचा प्रकार आहे. देव जाणे ऍरनॉल्डचे पत्रकार कधी ऐकतील.
या प्रसंगी पुढे बोलतांना ऍड. आंबेडकर म्हणाले की, आरक्षण बचाव यात्रा 25 जुलैपासून मुंबई येथून सुरू होईल. त्यानंतर 26 जुलै रोजी ती कोल्हापूरला पोहचेल. 26 जुलै रोजीच शाहु महाराजांनी आरक्षण देण्याची घोषणा केली होती. तेथे शाहु महाराजांना अभिवादन करून ही यात्रा पुढे कोल्हापूर, सोलापूर, या जिल्ह्यातून होत मराठवाड्यात येईल, मराठवाड्यानंतर विदर्भात जाईल, विदर्भानानंतर परत मराठवाड्यात येईल आणि या आरक्षण बचाव यात्रेचे समापण छत्रपती संभाजीनगर येथे 7 किंवा 8 ऑगस्ट रोजी एका जाहीर या यात्रेचा प्रवास संपेल. एससी आणि एसटी हे आरक्षण संवैधानिक आरक्षण आहे. ओबीसीचे आरक्षण कलम 346 प्रमाणे देण्यात आले आहे. ते आरक्षण सुध्दा संवैधानिक आहे पण एससी, एसटी प्रमाणे त्या आरक्षणाला संवैधानिक जोड देण्यात कमतरता राहिलेली आहे. तरी ते आरक्षण आज टिकून आहे. एससी, एसटी आरक्षणामध्ये अ ब क ड वर्गीकरणाची मागणी होत आहे यावर बोलतांना ऍड. आंबेडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका जाहीर सभेत अ ब क ड वर्गीकरण करू असे वचन दिले होते. मी सुध्दा ते कधी करतील याची वाट पाहत आहे. आरक्षण बचाव यात्रेचा उद्देश ओबीसीच्या हक्काचाच आहे. पण कोणाच्याही विरोधात नाही. हे सांगतांना मराठा समाजातील एका वर्गाचा आरक्षणासाठी आज नाही तरी कधी तरी विचार करावा लागेल असे सांगितले. आरक्षणाच्या मागणीमुळे राज्यातील जनतेमध्ये सलोख्याचे संबंध राहावेत आणि शांतात राहावी यासाठी राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाने पुढाकार घेण्याची गरज आहे. परंतू दुर्देवाने वंचित बहुजन आघाडीशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाने शांतता आणि सलोखाचा विचार केलेला नाही असे ऍड. आंबेडकर म्हणाले.
राज्य शासनाने जाहीर केलेला लाडकी बहिण, लाडका भाऊ यांना दिलेल्या योजनेमध्ये असलेल्या अंतरावर ताशेे ओढले. एका मट्रीक पास युवकाला 6 हजार रुपये आणि मॅट्रीक पास मुलीला फक्त 1500 रुपये. सोबतच 60 वर्षापेक्षा मोठ्या नागरीकांना तिर्थ यात्रा मोफत अशीही एक योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. या योजनेनुसार ज्येष्ठ नागरीकांना तिर्थ यात्रा तर मोफत दाखवली पण त्या शासन निर्णयानुसार ज्येष्ठ नागरीकांच्या पाल्यांकडे चार चाकी वाहन असेल तर ते या योजनेला पात्र नाहीत. नागरीकांचे पाल्य आयकरदाता असतील तरी ते पालक या योजनेला मान्य नाहीत. मग किती लोकांना मिळणार ही योजना असे सांगत ऍड. आंबेडकर म्हणाले की, निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदार आपल्याकडे ओढता आला नाही. त्यासाठी या योजनांच्या माध्यमातून मतदार आपल्याकडे ओढण्याचा हा प्रयत्न आहे असे सांगितले. तरी पण मतदार यांच्याकडे या योजनांमुळे ओढला जाईल याची शक्यता धुसर असल्याचे सांगितले.
या पत्रकार परिषदे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे नांदेड निरिक्षक सर्वजित बनसोडे, ऍड.अविनाश भोसीकर, प्रा.राजू सोनसळे, ऍड. यशोनिल मोगले, प्रशांत इंगोले, शिवा नरंगले आणि शाम कांबळे यांची उपस्थिती होती.