हरीण ऍटो ड्रायव्हरच्या कॅबीनमध्ये घुसल्याने घडली घटना
उमरी(प्रतिनिधी)- उमरी तालुक्यातील मौजे हातणी येथिल एकाच गावचे विद्यार्थी बळेगाव येथिल शाळेला जाताना चालत्या ऍपे ऍटोमध्ये हरिणाने झेप घेतल्याने ऍटो पलटी होऊन विद्यार्थाच्या अंगावर पडल्याने एक विद्यार्थी जागीच ठार झाला इतर दोन विद्यार्थी गंभीर जखमी असल्याने नांदेड येथे त्यांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. सदरची घटना दि 19 जुलै 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता च्या दरम्यान घडली आहे .
या बाबत मिळालेली माहिती अशी की उमरी तालुक्यात बळेगाव येथे कृष्णाबाई विद्या मंदिर माध्यमिक शाळा आहे या शाळेत हातणी येथिल ऍटो क्र एम एच 26 ए सी 1287 या ऍपे ऍटोने दररोज विद्यार्थी शाळेला ये-जा करीत होते एकूण 12 विद्यार्थाचा प्रवास होता. नेहमी प्रमाणेच हा ऍटो हातणी ते बळेगाव शाळेकडे दि. 19 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता जातांना अचानक हरिण ऊसाच्या फडातुन धावत आले आणि धावत्या ऍटोच्या कॅबिन मध्ये घुसल्याने ऍटो पलटी होऊन विद्यार्थाच्या अंगावर पडल्याने या अपघातात बारा िद्यार्थी की णेश गोंविद निलेवाड वय 13 वर्ग 7 वा याचा जागीच मुत्यू झाला आहे. तर त्या पैकी विनायक माधव मोगल वर्ग 6 वा, कु साक्षी सयाजी निलेवाड वर्ग 9 वा हे जंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे ऍम्ब्युलन्सने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला सकाळीच रवाना करण्यात आले आहे . विनायक माधव मोगल या विद्यार्थाची तब्बेत चितांजनक असल्याचे कळते बाकी सर्व उर्वरित ऍटो अपघातातील विद्यार्थाना किरकोळ मार लागल्याने त्यांना प्रथम उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. या घटनेबद्दल गोळेगाव शाळेत हातणी परिसरात शोककळा पसरली असून गणेश गोविंद निलेवाड या विद्यार्थ्याबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेचा पुढील तपास डीवायएसपी प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली उमरी पोलिस निरीक्षक अंकुश माने हे करीत आहेत .