नांदेड(प्रतिनिधी)-एका आईने आपल्या सुनबाई विरुध्द दिलेल्या अर्जाची चौकशी झाल्यानंतर त्याप्रकरणी सुनबाईविरुध्द ठकबाजी करणे, खोटे कागदपत्र बनविणे, ते खरे आहेत असे भासवून त्याचा दुरूपयोग करणे अशा सदराखांली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडेपुरी ता.लोहा येथील महानंद बापुराव चित्ते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर लोहा या न्यायालयात त्यांच्या सुनबाई दिक्षा सिध्दार्थ चित्ते यांनी काही सरकारी कर्मचारी आणि एजंट/ दलाल यांनी मिळून महानंदा या सिध्दार्थ चित्तेच्या आई असतांना बनावट आणि खोटी कागदपत्रे तयार करून ती न्यायालयात खरी आहेत असे दाखवले आणि न्यायालयाकडून आपल्या मर्जीचा आदेश करून घेतला. त्यामुळे न्यायालयाची सुध्दा फसवणूक झाली. या संदर्भाने महानंदा चित्ते यांनी 30 ऑगस्ट 2021 रोजी पोलीस ठाणे लोहा येथे अर्ज दिला होता. त्यात त्यांचा पूत्र सिध्दार्थ चित्ते हा शासकीय तंत्रनिकेतन हिंगोली येथे कार्यरत असतांना मरण पावला होता आणि त्याच्या वारसांसाठी 53 लाख 60 हजार रुपये मिळाले होते. त्यात महानंदाबाईचा हिस्सा 17 लाख 86 हजार 666 रुपये ोता. या अर्जाची चौकशी करून चौकशीमध्ये महानंदा यांनी दिलेल्या सर्व मुद्यांना पुष्ठी मिळाल्यानंतर लोहा पोलीसांनी नवीन अर्ज घेवून भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 467, 468, 471 प्रमाणे गुन्हा क्रमांक 253/2024 दाखल केला आहे. या प्रकरणातील फसवणूक करणाऱ्या सुनबाई सध्या किनवट येथे राहतात अशी नोंद प्राथमिकीमध्ये आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक रोडे हे करीत आहेत.