नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव येथील दुय्यम निबंधकाने नोंदणीच्या पैशांसह जवळपास 87 हजारांची अतिरिक्त लाच घेणाऱ्या हदगाव येथील दुय्यम निबंधकाला विशेष न्यायाधीश सी.बी. मराठे यांनी दुसऱ्यांदा तिन दिवस पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.
या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नोटा मोजण्याच्या मशीनसह 1 लाख 77 हजार 400 रुपये रोख रक्कम असा एकूण 1 लाख 82 हजार 900 रुपयांची जप्ती केली आहे. दुय्यम निबंधकाच्या घरी 4 लाख 65 हजार रुपये रोख सापडले आहेत. दि.12 जुलै रोजी दुपारी दुय्यम निबंधक कार्यालय हदगाव येथे गट क्रमांक 256/2 मधील 20 गुुंठे शेत जमीन मुद्रांक कार्यालयात नोंदणी (रजिस्ट्री) करण्यासाठी तक्रारदाराला 51 लाख 56 हजार 740 रुपये खर्च आला. त्यात दुय्यम निबंधक बालाजी शंकरराव उत्तरवार हे 1 लाख 99 हजार रुपये लाचेची मागणी करत होते. त्यामुळे त्याा तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याच दिवशी लाच घेवून गेल्यानंतर उत्तरवार यांनी मुद्रांक विक्रेता खाजगी व्यक्ती समीउल्ला उर्फ शमी याच्याकडे ती लाच रक्कम देण्यास सांगितली. ती लाच रक्कम स्विकारून त्याने ती ्कम शे अबुबकर उर्फ बाबुभाई करीम सिद्दीकी याच्याकडे दिली. या लाच प्रकरणात 4 हजार रुपयांची तडजोड झाली होती.
- दुय्यम निबंधकास तीन दिवसाची वाढीव पोलीस कोठडी
घरात सापडले 4 लाख 65 हजार
उत्तरवारच्या पत्नी शिक्षीका आहेत
पत्नीच्या नावावर एसबीआयमध्ये 40 लाख आहेत
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दुय्यम निबंधक उत्तम दादाराव जाधव यास अटक केली आणि न्यायालयाने 13 जुलै रोजी दोन दिवस अर्थात 15 जुलैपर्यंत दुय्यम निबंधक उत्तरवारला पोलीस कोठडीत पाठविले. आज पोलीस कोठडी संपल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरिक्षक प्रिती जाधव, पोलीस अंमलदार सचिन गायकवाड, मारोती मेकाले, यशवंत दाबनवारआदींनी लोकसेवक अर्थात दुय्यम निबंधक बालाजी शंकरराव उत्तरवार यास न्यायालयात हजर करून दहा मुद्दे उपस्थितीत करत वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली. त्यामध्ये बॅंक लॉकर तपासायचे आहे. लॉकर फ्रिज करायचे, घरी सापडलेल्या 4 लाख 65 हजारांबद्दल माहिती घ्यायची आहे. दोन खाजगी व्यक्ती फरार आहेत. बालाजी उत्तरवार यांच्या पत्नी शिक्षीका आहेत आणि त्यांच्या एसबीआय बॅंक खात्यात 40 लाख रुपये आहेत. याचाही शोध घ्यायचा आहे. या कारणांनाा अनुसरून सरकारी वकील ऍड. रणजित देशमुख यांनी सुध्दा पोलीस कोठडी वाढवून देणे का गरजेचे आहे याचे मुद्दे मांडले. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश मराठे यांनी बालाजी शंकरराव उत्तरवार या दुय्यम निबंधकाला तीन दिवस पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. या प्रकरणी उत्तरवारच्यावतीने ऍड.अमित डोईफोडे यांनी काम पाहिले.