नांदेड(प्रतिनिधी)-खोट्या शिधापत्रिका बनवून लोकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्याने भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. 1 जुलै 2024 पोलीस देशभरात भारतीय न्याय संहिता अंमलात आली आहे.
नांदेड तहसील कार्यालयातील पुरवठा निरिक्षक माधव विक्रम मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शेख महेमुद खाजा मियॉं मोबाईल क्रमांक 9588657900 याने 4 मार्च 2024 रोजी मिनाक्षी मधुकर पंडीत रा.गोविंदनगर यांना व इतर लोकांना तहसीलदार नांदेडचा बनावट शिक्का वापरून तसेच तहसीलदार पुरवठा असा बनावट शिक्का वापरून बनावट शिधा पत्रिका देवून त्यांच्याकडून पैसे घेतले आणि फसवणूक केली.
वजिराबाद पोलीसांनी शेख महेमुद खजा मियॉ याच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 467, 468, 471 नुसार गुन्हा क्रमांक 311/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय मंठाळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
देशात 1 जुलै 2024 पासून भारतीय न्याय संहिता 2023 हा कायदा भारतीय दंड संहितेच्या जागी अंमलात आला आहे. तरीपण वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा भारतीय न्याय सहितेनुसार न दाखल करता भारतीय दंड संहितेनुसार कसा दाखल केला न कळणारे कोडे आहे.