टिपरच्या धडकेत ऍटोतील तीन जण ठार; तीन जण जखमी

नांदेड(प्रतिनिधी)-एका टिपरने ऍटोला दिलेल्या धडकेत तीन जण जागीच मरण पावले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
बालाजी राजन्ना कट्टावाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.6 जूनच्या दुपारी 12.30 ते 1 वाजेदरम्यान महाराष्ट्र तेलंगणा सिमेवरील धर्माबाद पोलीस चौकीजवळ धर्माबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर टिपर क्रमांक ए-15 टी.बी.0467 च्या चालकाने भरधाव वेगात त्याच्या ऍटोला समोरून जोरदार धडक दिली. त्या धडकेत शेख मुजीब शेख बाबुमियॉं (44) रा.सरस्वतीनगर धर्माबाद, गणेश अशोक मुरारी (30) रा.धर्माबाद, पिराजी लक्ष्मण अडकेकर (50) रा.रत्नाळी ता.धर्माबाद हे तिघे जण जागीच मरण पावले. सोबत रोहित माधव डहाळे(20) रा.धर्माबाद, राजन्ना मुद्दन्ना कटावाड (35) रा.रत्नाळी आणि बालाजी राजन्ना कटावाड (28) रा.रत्नाळी हे तिघे जखमी झाले आहेत. धर्माबाद पोलीसांनी हा गुन्हा भारतीय न्याय संहितेच्या कलम 105, 325(ब) नुसार तसेच मोटार वाहन कायदा कलम 134/187 नुसार गुन्हा क्रमांक 155/2024 असा दाखल केला आहे. महिला पोलीस उपनिरिक्षक पवार या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *