नांदेड जिल्ह्यातून दोन पोलीस निरिक्षक आठ सहाय्यक पोलीस निरिक्षक दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी कार्यमुक्त
नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातून पोलीस महासंचालकांचे आदेश आणि त्यानंतर विशेष पोलीस महानिरिक्षकांचे आदेश यांना अनुसरून 4 जुलै रोजी दोन पोलीस निरिक्षक आणि 8 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना नांदेड येथून कार्यमुक्त करण्यात आले आहे. तसेच नांदेड जिल्ह्यात कार्यरत असलेले काही पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक यांना काहींना नियमित आदेश तर काहींना तात्पुरते आदेश देऊन नवीन नियुक्त्या दिल्याचे आदेश पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जारी केले आहेत.
नांदेडच्या धर्माबाद पोलीस ठाण्यातील अभिषेक लक्ष्मण शिंदे आणि इतवारा पोलीस ठाण्यातील राजकुमार पद्माकर पुजारी या दोघांना लातूर जिल्ह्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले आहे. नांदेड येथील शिवाजीनगरमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल दिपक भोसले, शहर वाहतुक शाखा वजिराबाद येथील रघुनाथ तुळशीराम शेवाळे, इतवारा येथील संग्राम उध्दव जाधव या तिन जणांना हिंगोली जिल्ह्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले आहे. वजिराबाद येथील आदित्य निवृत्तीराव लोणीकर, सिंदखेड येथील सुशांत गणपत किनगे आणि मुखेड येथील विनोद लक्ष्मण चव्हाण या तिघांना परभणी जिल्ह्यात जाण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले आहे. लोहा येथील रामदास माणिक केंद्रे आणि नियंत्रण कक्षातील रविंद्र राजेंद्र करे या दोघांना लातूर जिल्ह्यात जाण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले आहे.
पोलीस निरिक्षक धीरज दत्तात्रय चव्हाण यांना नियंत्रण कक्षातून पोलीस ठाणे सायबर प्रणालीमध्ये पाठविले आहे. नियंत्रण कक्षातील राजेश पुरी यांना शहर वाहतुक शाखा इतवारा येथे पाठविले आहे. वजिराबाद पोलीस निरिक्षक सदाशिव नागोराव भडीकर यांना हदगाव येथे प्रभारी अधिकारी या पदावर पाठविले आहे. जिल्हा विशेष शाखेचे शामसुंदर मधुकरराव टाक यांना विमानतळ सुरक्षा प्रभारी अधिकारी या पदावर पाठविले आहे. हदगाव येथील पोलीस निरिक्षक जगन गणपती पवार यांना जिल्हा विशेष शाखेत सुरक्षा विभागाचे प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहितील. जिल्हा विशेष शाखेतील प्रभारी अधिकारी पदावर विमानतळ सुरक्षाचे सुभाष पांडूरंग उन्हाळे यांना जागा दिली आहे. नियंत्रण कक्षात पोलीस निरिक्षक बाळासाहेब लक्ष्मण रोकडे यांना धर्माबाद येथे तात्पुरते प्रभारी अधिकारी या पदावर पाठविले आहे.
अपर पोलीस अधिक्षक यांचे वाचक श्रीनिवास कंठीराम राठोड यांना मुळ नियुक्तीच्या जागी एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. हनुमंत हरीशचंद्र मिटके यांना पोलीस नियंत्रण कक्षातून इतवारा पोलीस ठाण्यात पाठविले आहे.शंकर भागचंद डेडवाल यांना पोलीस नियंत्रण कक्ष ते शिवाजीनगर पोलीस ठाणे, वडेन्ना शिवलिंग आरसेवार पोलीस नियंत्रण कक्ष ते भाग्यनगर पोलीस ठाणे, दत्तात्रय गंगाधर मंठाळे यांना वजिराबाद सलग्न असतांना मुळ नेमणुक ठिकाणी एक वर्ष मुदतवाढ दिली आहे. सुभाष गोकुळ माने यांना शिवाजीनगर सलग्न ते शिवाजीनगर पोलीस ठाणे अशी नियुक्ती दिली आहे.दुर्गा बालाजीराव बारसे विमानतळ सुरक्षा यांना मुळ नेमणुकीच्या ठिकाणी एक वर्ष मुदतवाढ दिली आहे.(दुर्गा बारसे या जवळपास पाच ते सात वर्षापासून विमानतळ सुरक्षा येथेच कार्यरत आहेत.) नियंत्रण कक्षातील रवि माधवराव हुडेकर यांना मुखेड पोलीस ठाण्यात पाठविले आहे. नियंत्रण कक्षातील संजय देविदास पवार यांना अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षात नियुक्ती दिली आहे.नियंत्रण कक्षातील सहायय्क पोलीस निरिक्षक भागवत टिकाराम राठोड यांना कंधार येथे पाठविले आहे.
जलद प्रतिसाद पथकातील पोलीस उपनिरिक्षक गणपत गंगाधर पुपूलवार यांना जिल्हा विशेष शाखा सोबत जलद प्रतिसाद पथकाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. प्रियंका राजकुमार आघाव यांना विमानतळ पोलीस ठाण्यातून महामार्ग सुरक्षा पथकात कार्यमुक्त केले आहे. विजय पुंडलिकराव पाटील यांना माहूर पोलीस उपअधिक्षक कार्यालयातून छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी कार्यमुक्त केले आहे. गोपळ चंद्रपाल इंद्रळे यांना भाग्यनगर येथून कंधार येथे पाठविले आहे. नियंत्रण कक्षातील प्रविण मधुकर हालसे यांना पोलीस ठाणे वजिराबाद येथे पाठविले आहे.
पोलीस अधिक्षकांनी नांदेड जिल्ह्या बाहेर जाणारे दहा अधिकारी कार्यमुक्त केले आहेत तर 12 पेक्षा जास्त जणांचा नांदेड जिल्ह्यात खांदे पालट केला आहे. या पुढही काही बदल होणार असतील तर त्याची माहिती प्राप्त झालेली नाही.