धर्माबाद शहर कडकडीत बंद
धर्माबाद(प्रतिनिधी)-तालुक्यात वीरशैव लिंगायत समाज व सकल हिंदू समाजाच्या वतीने खोटे गुन्हे दाखल केल्याच्या संदर्भात हजारो तरुणांनी धर्माबाद शहर कडकडीत बंद ठेवून तहसीलदार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी आ.राजेश पवार यंाच्याविरोधात घोषणाबाजी केली.
धर्माबाद शहरात मनसेच्यावतीने सार्वजनिक हिताची मागणी करणारे बॅनर प्रदर्शित केले होते त्या कारणावरून भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी मनसेचे शहराध्यक्ष सचीन रेड्डी व बॅनर प्रिंटिंगचा व्यवसाय करणाऱ्या हनुमंत कत्ते वर खोटे गुन्हे दाखल केले होते त्याच्या निषेधार्थ आज धर्मबाद शहरांमध्ये सकल वीरशैव लिंगायत समाज व सकल हिंदू समाजाच्या वतीन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शहरासह तालुक्यातील मोठ्याप्रमाणात तरुण सहभागी झाले होते. आमदार राजेश पवार यांच्या एकाधिकारशाही व हुकूमशाहीने धर्माबाद शहर त्रस्त झाले असून मतदारसंघातील जनता सुद्धा व्यतीत झालेले असल्याची भावना या जन आक्रोश मोर्चातून दिसून आली. यावेळी मोर्चाकरूनी मनसे शहराध्यक्ष सचन रेड्डी व हनमंत कत्ते यांच्यावर दाखल झालेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी या मोर्चाकरूंनी केली.
अत्यंत शांत आणि संयमाने निघालेल्या या मोर्चातून जनतेचा आक्रोश सिद्ध होत होता अत्यंत छोटे असलेल्या विषयाला हवा देऊन राजकारणाने प्रेरित होऊन हे गुन्हे दाखल केले त्यामुळे जनतेचा हा आक्रोश स्पष्ट दिसून येत होता. धर्माबाद तालुक्यातील सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध झाला विशेष म्हणजे या मोर्चाला धर्माबाद तालुक्यातील 36 समाज संघटनेने पहिल्यांदाच लेखी पाठिंबा.
तहसील प्रशासनाला निवेदन देत असताना अनेक मान्यवरांची या ठिकाणी भाषणे झाली. धर्माबाद शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आपली उत्स्फूर्तपणाने प्रतिष्ठान बंद ठेवून सचिन रेडी व हनुमंत कते या दोन तरुणावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सहकार्य केले. अत्यंत शांततेने हा मोर्चा तहसीलदार व पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन शांततेच्या मार्गाने संपला.