तोतय्या पोलीस बनुन 8 लाख 22 हजारांना लावला चुना

नांदेड(प्रतिनिधी)-खोटे पार्सल आल्याचे सांगून आणि तोतय्या पोलीस बनून सुध्दा 8 लाख 22 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार शिवाजीनगर पोलीसांनी दाखल केला आहे.
विक्रमकुमार पाटणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 जून 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता मोबाईल क्रमांक 9306337692 आणि 9079502777 या दोन क्रमांकावरुन कॉल आले त्यात कोणी विक्रमसिंह बोलत होता. एकाने त्यांना पार्सल आल्याचे खोटे सांगून तसेच तोतय्या पोलीस बनून विक्रमकुमार पाटणीकडून वेगवेगळ्या खात्यांवर 8 लाख 22 हजार रुपये हस्तांतरीत करायला लावून फसवणूक केली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 218/2024 प्रमाणे दाखल केला असून पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक माने अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *