तहसीलदार बोथीकर सुट्टीवर विभागीय चौकशी सुरू असलेले संजय वारकडच तहसीलदार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड तहसील कार्यालयात तहसीलदारांची आदलाबदली हा एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. ज्या तहसीलदाराची कायम नियुक्ती नांदेड तहसीलदार म्हणून आहे. ते बहुतांश दिवशी सुट्टीवर आहेत आणि ज्यांची नियुक्तीच नाही असे तहसीलदार संजय वारकड यांच्याकडे तहसीलदार पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशाने सुरू असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
मागे सर्वसाधारण बदल्यांमध्ये नांदेड तहसीलदार या पदावर बोधीकर यांची नियुक्ती झाली होती आणि नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यंाची नियुक्ती संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार पदावर झाली होती. बदली झाल्यानंतर प्रभारांची देवाण-घेवाण झाली. तरी पण कोणत्या तरी जादूने आजही तहसीलदार पदावर संजय वारकडच काम करत आहेत आणि नांदेड तहसीलदार पदावरचे बोथीकर काही ना काही कारणाने सुट्टीवरच आहेत. संजय वारकडच्या नांदेड तहसीलदार पदाचे कार्यभार सांभाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत अशी माहिती सांगण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील दुवा वापरण्यात आलेला आहे.
संजय वारकड यांच्याविरुध्द लातूर येथे विभागीय चौकशी सुरू आहे अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली. ती विभागीय चौकशी कोणत्या कारणासाठी आहे, काय प्रकरण घडले होते. याची माहिती मिळवता आली नाही. तहसीलदार संजय वारकड यांच्या मुळ बदली आदेशावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुक आचार संहितेदरम्यान त्यांनी कार्यकारी पद असलेल्या तहसीलदार पदावर काम करू नये असे आदेशात आहे असे सुत्रांनी सांगितले आहे. कोणत्या दुव्याच्या आधारे संजय वारकड हे बोथीकरला खो देऊन तहसीलदार पद सांभाळत आहेत. याचा शोध विद्यावाचस्पती स्तरावर होणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *