स्वस्त धान्य दुकानदारांचे धरणे आंदोलन

नांदेड,(प्रतिनिधी)-अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवाना धारक महासंघ पुणेशी सलग्न असलेल्या नांदेड शाखेने आज तहसील  कार्यालयासमोर आज आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. राज्य संघटनेेने ठरविलेल्याप्रमाणे या धरणे आंदोलनाचा दुसरा टप्पा 2 जुलै रोजी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, साखळी उपोषण करून होणार आहे.
अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार आज दि.27 जून रोजी राज्यभरातील तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाचा हा टप्पा 8 जुलै पर्यंत विविध मार्गाने सुरू राहणार आहे. त्यात 2 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन होणार आहे.


नांदेड येथील जिल्हाध्यक्ष रमेश गांजापुरकर यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये महागाई निर्देशकानुसार वाढवावी. शासकीय धान्य गोदामातून आलेले धान्य वजन करूनच देण्यात यावे. लाभार्थ्यांची आधार क्रमांक पडताळणी ही निरंतर प्रक्रिया असावी.प्रलंबित मार्जिन रक्कमेची अदायगी तातडीने करावी. तहसील कार्यालयात शिधापत्रिका ऑनलाईनची सर्व कामे तातडीने पुर्ण करून घेण्यात यावी. धान्य केवळ जुट बारदानमध्ये देण्यात यावे. रोख सबसेडीऐवजी अन्नधान्य देण्यात यावे. 90 हजार शिधापत्रिका अंत्योदय ऐवजी प्राधान्य कुटूंब योजनेत वर्ग करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन सुरू आहे. या निवेदनावर आयुब खान बुरानखान, किशनराव सावंत, सत्तार अहेमद खिजर अहेमद, पी.पी.आरेवार, शेख इरफान शेख बाबु, सय्यद मुस्तफा साब, मारोतराव संगेवार, व्यंकटराव ठोके, इरफान सज्जू, धर्मराज मिसाळ, मधुकर काळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *