आज पहिल्यांदा नांदेडहून स्टार एअर विमानाने पुण्यासाठी केले उड्डाण

नांदेड(प्रतिनिधी)-स्टार एअर कंपनीचे विमान आज पहिल्यांदा नांदेड-पुणे या प्रवासासाठी उंच उडाले. 55 मिनिटांमध्ये या विमानाने पुणे गाठले. हे विमान नागपूर-नांदेड-पुणे असे जाते आणि पुन्हा परत पुणे-नांदेड-नागपूर असे उड्डाण भरते. आज पहिल्या दिवशी या विमानातून 52 प्रवाशांनी अवकाशात झेप घेतली.
नांदेड शहरात श्री गुरू गोविंदसिंघजी विमानतळ 2007 मध्ये बनविण्यात आले. पण त्यानंतर अपेक्षीत अशा विमान प्रवासाचा लाभ नांदेडकरांना मिळाला नाही. काही एअर कंपन्यांनी आपले विमान सुरू केले. त्यात बॅंगलोर, अमृतसर, दिल्ली अशा विमान सेवा सुरु झाल्या. परंतू या विमानसेवा काही काळासाठीच अस्तित्वात राहिल्या. एअर कंपन्यांनी आपल्याला मिळणारा प्रतिसाद पाहुने त्या बंद केल्या.
श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळावरून सध्या दिल्ली,अहमदाबाद, हैद्राबाद, भुज, तिरुपती, बैंगलोर, जालंदर आदी ठिकाणी काही दिवसांपासून विमानसेवा सुरू आहे. यात नांदेड ते पुणे आणि नांदेड ते नागपूर अशी विमानसेवा हवी याची मागणी होत होती. या मागणीला स्टार एअरने प्रतिसाद देत नागपूर-नांदेड-पुणे, अशी विमान सेवा सुरू केली. आज 27 जुन रोजी पहिल्यांदा नागपूरहुन आलेले विमान पुण्याकडे झेपावले. सकाळी 10.30 मिनिटाला या विमानाने उड्डाण घेतली. त्यात 52 प्रवाशांनी याचा लाभ घेतला. त्यानंतर परतिच्या प्रवासात दुपारी 1 वाजता या विमानाने पुन्हा पुणे ते नांदेड असा प्रवास केला आणि त्यानंतर नांदेड ते नागपूर असे उड्डाण केेले. आज पहिल्या दिवशी या नांदेड ते पुणे या प्रवासासाठी 2800 रुपये भाडे आकारण्यात आले होते. 55 मिनिटात हे विमान पुण्यात पोहचते. या विमानसेवेचा अनेकांना फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *