नांदेड(प्रतिनिधी)-रागाच्या भरात मी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला पण दहा वर्षात भाजपाकडे काही मागितल नाही कि कोणती निवडणुकही लढवली नाही. पण भारतीय जनता पार्टीला मात्र कॉंगे्रसची माणसे मारायची आहेत. त्या माणसांना त्यांनाा जगवायचे नाही असा थेट आरोप माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षात प्रवेश केल्यानंतर नांदेड रेल्वे स्थानकावर माध्यमांशी बोलतांना केला.
राष्ट्रवादी कॉंगे्रस शरद पवार गटात माजी राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील यांनी पक्ष प्रवेश मंगळवारी मुंबई येथे केल्यानंतर त्यांचे प्रथमच नांदेड नगरीत आगमन झाल्यानंतर रेल्वे स्थानकावर पत्रकारांशी बोलतांनाा म्हणाल्या की, आता एक पर्व संपल शांतीच आता कामाच पर्व आहे. खुप काम करायच आहे. विधानसभेच्या जागा लढवू, घरी बसलेले आहेत त्यांना वाटत होत आता कस होणार. नवीन सुरुवात आहे चिंता करू नका. खा.शरद पवार यांना मी शब्द दिला. फिरुन जन्मेन मी म्हणजे पुन्हा आता जोमाने पक्षाच्या बांधणीसाठी, पक्ष वाढीसाठी काम करणार आहे. यावेळी पत्रकारांनी जुन्या सहकाऱ्यांबाबत विचारले असता त्यांना तुम्ही आता पक्षात पन्हा घेणार आहात का? यामध्ये माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर, माजी आ.शंकरअण्णा धोंडगे यांच्यासह काही जण राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्ष सोडून गेले. याबाबत विचारले होते. त्यावेळी कोणी पक्षात या म्हणून विनंती केली किंवा त्याच्या मागे तगादा लावला तर ते पक्षात येत नाहीत. मलाही मागील पाच वर्षापासूनडॉ.सुनिल कदम हे पक्षात येण्यासाठी सांगत होते. पण मी योग्य वेळी योग्य निर्णय घेवून राष्ट्रवादी कॉंगे्रसमध्ये प्रवेश केला. याबाबत पत्रकारांनी विचारले असता. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंगे्रस विधानसभेच्या किती जागा लढवणार याबाबत त्या म्हणाल्या की, मला पाच दिवसांचा वेळ द्या असे सांगितले.
अशोक चव्हाण गेल्याच दु:खच आहे. पण अशोक चव्हाणांच काय बर होईल ते त्यांनाच माहित होईल. पण भारतीय जनता पार्टीला कॉंगे्रसचे माणसे मारायचे आहेत. त्यांना जगवायचे नाही. मी या अगोदरही अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याच्यानंतर हेच विधान केल होत. अशोक चव्हाण यांनी भाजपात जाऊन स्वत:चे खुप मोठ नुकसान करून घेतल.