नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीच्या पराभवाची कारण मिमांसा करण्यासाठी आज राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे येणार होते. यासाठी शासकीय विश्रामगृहात बैठकीची तयारी सुरू असतांना आज पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आपासात गोंधळ माजला. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आले.
भारतीय जनता पार्टीच्या नांदेड लोकसभा मतदार संघातील पराभवाची कारण मिमांसा करण्यासाठी काल रावसाहेब दानवे हे नांदेडला आले होते आणि आज राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आले आहेत. त्यांच्या येण्याअगोदर विश्रामगृहात जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आपसात पुन्हा एकदा वाद झाला. मागे सुध्दा असाच वाद बैठकीत झाला होता. त्यामध्ये दिलीप कंदकुर्ते अणि बालाजी पुयड समोरा-समोरा झाले होते. आजही एकीकडे दिलीप कंदकुर्ते आणि दुसरीकडे घोगरे असे चित्र दिसत होते. परंतू वादाचा परिणाम काही अघटीत घडला नाही. शब्द बाणांनी एक दुसऱ्यावर वार करण्यात आले आणि काही वेळात पुन्हा शांतता झाली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आल्यानंतर काय घडले याची माहिती अद्याप मिळाली नाही.