नांदेड(प्रतिनिधी)-नवा मोंढा भागातील जुन्या शासकीय गोदामात सुरू असलेले बेकायदा काम एमआरटीपी कायद्यातील कलम 53(1) आणि 54(1) नुसार बंद करून जिनेन इंफ्रा या कंस्ट्रक्शन कंपनीविरुध्द कार्यवाही करावी असे निवेदन आम आदमी पार्टीच्यावतीने नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात आले आहे.
जुने शासकीय गोदाम ज्याचा सिटी सर्व्हे क्रमांक 11064 आहे हा मोठा भुखंड महानगरपालिकेने एका ठरावानुसार बीओटी तत्वावर विकास करण्यासाठी मे.जिनेन इंफ्रा या कंपनीला दिला. या कंपनीचे सर्व्हेसर्वा केतन नागडा आहेत.महानगरपालिकेने या अगोदर सतिश माहेश्र्वरी या कंत्राटदाराच्या सात पिड्यांचे भले केल्यानंतर आता केतन नागडा यांच्या सात पिढ्यांच्या उथानाचे काम मनपा करत आहे.
आम आदमी पार्टीच्यावतीने या ठिकाणी बांधकाम परवानगी दिली काय याची विचारणा केली असता अजून मंजुर झाली नाही असे उत्तर महानगरपालिकेने दिले होते. तरीपण 4 जूनपासूनच या ठिकाणी मोठ-मोठ्या मशीन आणून बांधकाम सुरू करण्यात आले आहे. आम आदमी पार्टीने 20 जून रोजी पुन्हा एक नवीन अर्ज मनपा आयुक्तांना दिला असन शासकीय गोदामाच्या शेजारची मोकळी जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेला देण्याबाबत 11 डिसेंबर 2014 रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून त्याबाबत कोणतीही कार्यवाही मनपा कार्यालयाकडून करण्यात आली नाही आणि ही जागा कंस्ट्रक्शन कंपनीला दिली. बांधकाम परवागनी न मिळता सुरू असलेले अवैध बांधकाम एमआरटीपी कायद्यातील नोटीस देवून रोखावे आणि आम्ही दिलेल्या दि.11 जून 2024 च्या निवेदनावर काय कारवाई झाली. याबाबत माहिती देण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर आम आदमी पार्टीचे प्रवक्ता ऍड.जगजीवन भेदे, सचिव डॉ.अवधुत पवार, ऍड.सचिन थोरात, ऍड.बी.एम.पवार, साहेबराव मगर, एस.एम.कांबळे, भाऊसाहेब बोडके, बी.आर.सोनाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.