सोमवारी मुखेड येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन

नांदेड,(जिमाका)- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुखेड यांच्यावतीने सोमवार 24 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आर्य वैश्य मंगल कार्यालय, मुखेड येथे आयोजित केला असून या मेळाव्याचे उद्घाटन आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या हस्ते होणार आहे.

या मेळाव्यास आमदार राम पाटील रातोळीकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या सहसंचालक पी.टी. देवतळे, तहसिलदार राजेश जाधव, गटविकास अधिकारी रामोड, मुखेड उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. किशोर कदम यांची उपस्थिती राहणार आहे.

या मेळाव्यास तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. यात प्रामुख्याने दहावी, बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रीया, कलमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना माहिती, करिअर प्रदर्शनी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

या मेळाव्यासाठी मुखेड तालुक्यातील शाळा, महाविद्यालय व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने क्यआर कोड स्कॅन करुन आपली नोंदणी करावी. तसेच https://mahacareer.globalsapio.com/ या गुगल फार्म लिंकवर नोंदणी करुन सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी. गणवीर व प्राचार्य जी.जी. पाटनुरकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुखेड जि. नांदेड येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *