सार्वजनिक बांधकाम विभागात सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

नांदेड(प्रतिनिधी)-जुना कौठा भागातील विकासनगरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सुरू असलेले रस्त्याचे चुकीचे काम थांबावे म्हणून निवेदन दिल्यानंतर सुध्दा कार्यवाही होत नाही म्हणून आज सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लोकांनी त्यांचे मत परिवर्तन केले.

जुना कौठा भागात विकासनगर भागाच्या गृहनिर्माण संस्थेमध्ये रस्त्याचे काम सुरू आहे. हे रस्त्याचे काम एका कंत्राटदाराला दिले आहे, काम दुसराच कंत्राटदार करतो आहे. या प्रकरणी सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे, व्यापारी पवन लालवाणी यांनी अनेक तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिल्या. पवन लालवाणी यांनी तर मंत्रालयात तक्रार दिली आहे. मंत्रालयातून सुध्दा या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याच्या सुचना आल्या आहेत.
उत्तम वरपडे सांगतात की, या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामामुळे अनेक रहिवाशांचे ड्रेनेज फुटले, नळ तोडण्यात आले. या संदर्भाने ते पुन्हा दुरूस्त करून देण्यात यावे अशी मागणी केल्यानंतर कंत्राटदार अरे रावीने बोलतो , काय करायचे ते करा असे सांगतो, सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रारी देवून सुध्दा त्यावर कार्यवाही होत नाही यामुळेच मी आज सार्वजनिक बांधकाम विभागात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लोकांनी दिलेल्या आश्र्वासनानंतर मी सध्या माझे मत बदलले आहे. परंतू विकासनगर सोसायटीतील लोकांच्या समस्या सोडविण्यात आल्या नाही तर मी लोकशाही पध्दतीने पुन्हा आंदोलन करणारच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *