20 वर्षीय युवतीने अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली

नांदेड(प्रतिनिधी)-एका 20 वर्षीय युवतीने एका युवकाच्या अत्याचाराला कंटाळून उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.युवकांच्या आमीषाला युवतींनी बळी पडण्याचा हा काही पहिला प्रकार नव्हे. आता तरी युवतींनी या घटनेतून शिकण्याची गरज आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 20 वर्षीला धनराज मोरे नावाच्या युवकाने आपल्या जाळ्यात ओढले. तुझ्यासोबत लग्न करतो असे आमीष दाखवले. तिचा भरपूर उपयोग करत. तिच्यासोबत अनेकदा अत्याचार केले आणि त्यानंतर धनराज मोरे तिचा शारीरीक छळ करु लागला. तिला मारुन टाकण्याच्या धमक्या देऊ लागला. हा त्रास असह्य झाल्याने 20 वर्षीय युवतीने उंदीर मारण्याचे विषारी औषध पिऊन घेतले. उपचारादरम्यान 16 जूनच्या मध्यरात्रीनंतर तिचा मृत्यू झाला. तिच्या आईने दिलेल्या तक्ररीवरुन भाग्यनगर पोलीसांनी धनराज मोरे विरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 306, 323, 504 नुसार गुन्हा क्रमांक 251/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक नागरगोजे यांच्याकडे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *