नांदेड(प्रतिनिधी)-आता पांढऱ्या शिधा पत्रिका धारकांना सुध्दा आपली शिधा पत्रिका आधार कार्ड सोबत जोडून महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येईल.
महाराष्ट्राच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील कक्ष अधिकारी आशिष आत्राम यांच्या स्वाक्षरीने 18 जून रोजी जारी करण्यात आलेले पत्र राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्न धान्य वितरक अधिकारी आणि सर्व उपनियंत्रक शिधा वाटप मुंबई यांना अग्रशित करण्यात आले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 26 फेबु्रवारी 2019 च्या शासन निर्णयाद्वारे महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून राज्यात एकत्रीतपणे या योजना राबविण्यासाठीचा निर्णय घेण्यात आला आहे. 28 जुलै 2023 रोजी त्या शासन निर्णयानुसार जन आरोग्य योजनांचा लाभ शुभ्र शिधापत्रिका धारक कुटूंबियांना सुध्दा देण्यात आलेला आहे. तरी शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी सलग्न करण्याची कार्यवाही सुरू करण्यात यावी असे या पत्रात नमुद केल आहे.