अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्तीने 37 वर्षीय व्यक्तीचा खून केला

नांदेड(प्रतिनिधी)-हारुनबाग परिसरात 15-16 जूनच्या रात्री एका 37 वर्षीय व्यक्तीचा अज्ञात मारेकऱ्यांनी अज्ञात कारणासाठी खून केल्याचा प्रकार घडला आहे.
अब्दुल नईम अब्दुल रहिम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 जूनच्या रात्री 11 ते 16 जूनच्या मध्यरात्रीनंतर 1 वाजेदरम्यान हारुनबाग भागातील मोकळ्या जागेत त्यांचे बंधू अब्दुल मन्सुर अब्दुल रहिम (37) यास कोणी तरी अज्ञात माणसाने अज्ञात कारणासाठी त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजुला धार-धार शस्त्रांनी हल्ला करून त्याचा खून केला आहे. इतवारा पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 220/2024 नुसार दाखल केली आहे. या खूनाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक चव्हाण करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *