19-20 वर्षीय युवतीचा संशयास्पद मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-आज पहाटे भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 19-20 वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या संदर्भाने वृत्तलिहिपर्यंत कोणत्याही तक्रारीची नोंद भाग्यनगर पोलीस ठाण्यात झाली नव्हती.
आज सकाळी एका 19-20 वर्षीय युवतीला त्यांच्या घरच्या नातलगांनी शासकीय रुग्णालयात नेले असतांना ती युवती दवाखान्यात आणण्यापुर्वीच मरण पावली होती. सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे त्या युवतीने आत्महत्या केली होती. आत्महत्ये मागे प्रेम प्रकरण असल्याची चर्चा सुध्दा त्या भागात होत होती. परंतू कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाली आहे. युवतीवर अंतिमसंस्कार करण्यात आले असतील असे सांगण्यात आले. याबद्दलची तक्रार नंतर येवून देतो असे त्या मयत युवतीच्या वडीलांनी सांगितल्याची माहिती हाती आली आहे. ज्या भागात युवतीचे घर आहे. त्या भागातील नागरीक या घटनेला प्रेम प्रकरणाचा स्वरुप देत आहेत. यातील सत्यता मात्र अद्याप समोर आली नाही. किंबहुना जोपर्यंत तक्रार येणार नाही तो पर्यंत या प्रकरणातील सत्य समोर येणे अवघड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *