नांदेड(प्रतिनिधी)-आज महात्मा बसवेश्र्वर जन्मोत्सवानिमित्त पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अनेकांनी महात्मा बसवेश्र्वरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आज 10 मे रोजी अर्थात अक्षय तृतीयेच्या दिवशी महात्मा बसवेश्र्वर यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा होतो. यानिमित्त पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी महात्मा बसवेश्र्वरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी पोलीस नियंत्रण कक्ष, पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व विभागांचे पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस अंमलदार संजय सांगवीकर आणि विनोद भंडारे यांनी या अभिवादन कार्यक्रमाची तयारी पुर्ण केली. Kanthak Suryatal Post Views: 819 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation काही व्यापाऱ्यांसाठी अक्षय तृतीयेची पहाट आयकर विभागाने काळी ठरवली खुनाचा प्रयत्न करून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हा शाखेने पिस्टलसह जेरबंद केले