युवाशक्ती करीअर शिबिराच्या माध्यमातून ;युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध

 

 *आमदारांची कार्यक्रमाला उपस्थिती* 

*युवाशक्ती करीअर शिबिरात 800 युवक-युवतींचा सहभाग* 

· युवक- युवतीनी करिअर शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड- दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी या विषयावर शासनाच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबिर संकल्पना राबविण्यात येत आहे. या युवाशक्ती करीअर शिबिराच्या माध्यमातून युवक-युवतींना रोजगाराच्या संधी व मार्गदर्शन मिळेल, या संधीचा युवक-युवतीनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार बालाजी कल्याणकर व आमदार आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केले.

औद्यागिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन आज कामगार कल्याण मंडळाचे ललीतकला भवन लेबर कॉलनी येथे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते दोघे उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई , शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्यावतीने आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे उदघाटन आज आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते झाले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास राठी , उद्योजक अरुण फाजगे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर. बी. गणवीर , रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस.व्ही. सुर्यवंशी, उद्योजक अरुण फाजगे आदीची उपस्थिती होती.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून आयोजित शिबिरातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी व मार्गदर्शन मिळून मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. या युवाशक्ती करीअर शिबिराचा युवक-युवतीनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केले. तसेच त्यांनी या मेळाव्यात उपस्थित युवक- युवकांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून 800 युवक व युवतींनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी व उज्वल भविष्यासाठी प्रा. सारिका बकवाड यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता 10 व 12 वी नंतरच्या संधी याबाबत संजय सारडा यांनी मार्गदर्शन केले. सुहास राऊत यांनी शैक्षणिक कर्ज व स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय योजना याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला. यावेळी विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्तावना जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी. गणवीर यांनी केले. करीअर मार्गदर्शन संबंधी विविध महामंडळामार्फत प्रदर्शन भरविण्यात आले होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे उपप्राचार्य कंदलवाड व्ही.डी. यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राका यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *