बारुळ कौठा ता.कंधार येथे सहा दरोडेखोरांनी लुटून नेली लाखोंची रक्कम आणि लाखोंचे दागिणे

नांदेड(प्रतिनिधी)-बारुळ कौठा ता.कंधार या ठिकाणी आज शनिवारचा सुर्योदय होण्यापुर्वीच एका घरावर दरोडा टाकून दरोडेखोरांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. अशाच प्रकारचे दरोडे मागील वर्षी सुध्दा कंधार तालुक्यात पडले होते.
आजचा सुर्योदय होण्याअगोदर बारुळ कौठा येथील शेती साहित्याचे विक्रेता गजानन हरी येरावार यांच्या घरावर हा दरोडा पडला. कौठा गावात येरावार यांचे दुकान तळमजल्यावर आहे तर पहिल्या मजल्यावर घर आहे. घरात गजानन येरावार, त्यांच्या पत्नी अणि एक त्यांचा मुलगा आहे. चार चाकी वाहनातून आलेल्या दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश करताच येरावार यांना चाकु आणि विविध हत्यारांचा धाक दाखवून त्यांच्याकडून चाबी घेतली आणि तिजोरी आणि कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. प्राप्त माहितीनुसार अद्याप वृत्त लिहिपर्यंत या गुन्ह्याचाची नोंद झाली नव्हती परंतू सध्याचे दिवस हे कृषी साहित्याचे विक्रीचे दिवस असल्याने लाखोंची रोकड येरावार यांच्या घरात असेल आणि सोबतच सोन्या चांदीचे दागिणे सुध्दा भरपूर असतील असे सांगितले जात आहे. कौठा गावातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जवळपास 20 लाख रुपये रोख रक्कम आणि 15 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे दरोडेखोरांनी नेले असावेत असा अंदाज आहे. आपल्याकडे आलेली रक्कम सुध्दा येरावार यांनी मोजून ठेवलेली नव्हती. त्यामुळे सुध्दा त्याचे गणित लावण्यात भरपूर वेळ लागत आहे. चार चाकीमध्ये आलेल्या या सहा दरोडेखोरांनी टाकलेला हा दरोडा पुर्वनियोजित रेकी करून असावा असे म्हटले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे यांच्यासह अनेक पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक आणि बऱ्याच पोलीस अंमलदारांनी या घटनास्थळाला भेट दिली आहे. दरोड्याच्या घटनेतील पुढील माहिती विकसीत करण्यासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ञांच्या पथकांना सुध्दा बोलावण्यात आले आहे. मागील वर्षी सुध्दा अशाच चार चाकी गाडीमध्ये येवून दरोडेखोरांनीकंधार तालुक्यात दरोडे टाकलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *