ऍड.प्रकाश आंबेडकरांनी मला पाठींबा दिला नाही याची खंत-खा.वर्षा गायकवाड

नांदेड(प्रतिनिधी)-नुकत्याच होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठींबा दिला होता. पण मला सहकार्य केल नाही किंवा पाठींबाही दिला नाही. मी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेवूनच समाजात काम करते. यामुळे समाजाचा घटक म्हणून त्यांनी मला सहकार्य करणे अपेक्षीत होत. पण केल नाही ही खंत मला वाटते असे मत नवनिर्वाचित खासदार वर्षा एकनाथ गायकवाड यांनी व्यक्त केली.
नांदेड येथे विवाह समारंभाच्या निमित्ताने खा.वर्षा गायकवाड ह्या आल्या असता त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलत असतांना म्हणाल्या की, यावेळी मतदारांनी संविधान, लोकशाही आणि महत्वाच्या मुलभूत प्रश्नांवर ही निवडणुक झाली. येणाऱ्या काळात महाविकास आघाडीला अधिकच काम कराव लागणार आहे. हे मतदान राष्ट्रासाठी, राष्ट्राच्या एकातमतेसाठी आणि सामाजिक सलोखा आबाधीत ठेवण्यासाठी मतदान झाल आहे. मीही या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून कॉंगे्रस पक्षाच्यावतीने लोकसभेत उभी होते. माझी अपेक्षा होती समाजाचे नेते म्हणनू ऍड. प्रकाश आंबेडकरांनी मला सहकार्य करावे. अपेक्षा करणे हे काही चुकीचे नाही. मी महामानव डॉ.बाबाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पाईक आहे. त्यांचे विचार घेवून काम करते. माझ काम बघा मी मुंबईत, विधानसभेत, पक्षात आणि माझ्या मतदार संघात जे काम करते ते काम बघा. मला अपेक्षा होती सहकार्य करायला पाहिज होते. पण दुर्देवाने ते झाल नाही. आपली लढाई कोणासोबत आहे. मनुवादी, गोळवळकर, हेडगेवार यांच्या विचारांशी आहे. आपण रेशीम बाग विरुध्द दीक्षाभुमी अशी आपण लढाई म्हणतो. पण समाजाच्या हितासाठी, राष्ट्राच्या हितासाठी आणि संविधानाच्या हितासाठी आपण एकत्र येवून लढा दिला पाहिजे अशी अपेक्षा आहे.
याचबरोबर येणारी विधानसभा निवडणुकही आम्ही एकत्र बसून महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालीच लढविण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्यात कुठलाही वाद नाही असे शेवटी त्यांनी म्हटले. यावेळी अशोक चव्हाणांच्या बाबतीत विचारल असता त्या म्हणाल्या की, नांदेडच्या जनतेने जे उत्तर दिल. त्याचा मला आनंद वाटला. नेते कुठेही गेले तरी जनता विचारांच्यासोबत आहे. सत्याबरोबर आहे. नेते कुठेही जावू शकतात कारण त्यांच्यावर राजकीय दबाव असू शकतो, सत्तेसाठी, पैशासाठी अन्य काही कारणासाठी नेते पक्ष बदले तरी जनता मात्र पक्ष बदलत नाही आणि या निवडणुकीत लोकप्रतिनिधींनाा पण एक गोष्ट जनतेने शिकवले की, तुम्ही जरी पक्ष बदले तरी आम्ही बदलणार नाही. लोकांना जे स्विकारायचे आहे तेच शेवटी स्विकारतात असेही त्या यावेळी म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *