किनवटमध्ये हिरो शोरुम फोडले

नांदेड(प्रतिनिधी)-किनवट येथील चुंगी नाकाजवळ एक शटर फोडून चोरट्यांनी त्यातून 73 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.
सागर किशनराव ओदीवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 जूनच्या रात्री 8.30 ते 13 जूनच्या सकाळी 9 वाजेदरम्यान एका शोरुमचे शटर तोडून चोरट्यांनी दुकानातील नाण्यांचा साठा, दोन ग्रॅमची लक्ष्मी मातेची मुर्ती, एक सॅमसंग मोबाईल व सीसीटीव्ही डीव्हीआर असा 73 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. हा शटर हिरो होंडा कंपनीचे आहे. किनवट पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 158/2024 नुसार दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार वाडगुरे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *