आंबुलगा गावात बस चालक आणि बस वाहकास मारहाण

नांदेड(प्रतिनिधी)-आंबुलगा गावात बस चालक आणि बस वाहकास मारहाणा करणाऱ्या दोन जणांविरुध्द कंधार पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ब्रम्हाजी शिवाजी मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.13 जून रोजी ते कंधार आगाराची बस क्रमांक एम.एच.14 बीटी 1506 घेवून मुखेड ते कंधार मार्गे पेठवडज असा प्रवास करत असतांना आंबुलगा गावाजवळ सकाळी 11.30 वाजेच्यासुमारास असा प्रकार घडला की, बसमध्ये प्रवासी जास्त असल्याने काही प्रवाशांना बसमध्ये प्रवेश मिळाला नाही. पुढे केवला तांडा येथे गोविंद दत्तात्रय टेंभुर्णे आणि भिमराव गुंडे या दोघांनी बस समोर दुचाकी आडवी उभी करून बस थांबवली. तुम्ही आमच्या गावाचे पुर्ण प्रवाशी घेवून का आले नाहीत असे म्हणून त्यांच्या हातातील पाईपने त्यांना आणि वाहकाला मारहाण केली. शासकीय कामात अडथळा, रस्ता रोखणे, शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण करणे आदी सदरांखाली पोलीस ठाणे कंधार यांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 184/2024 नुसार दाखल केला आहे. याचा तपास पोलीस अंमलदार काळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *