स्थानिक गुन्हा शाखेने बेकायदेशीर वाळू वाहतुकीच्या दहा गाड्या पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)-आज दि.12 जूनचा सुर्योदय होण्याअगोदर स्थानिक गुन्हा शाखेने अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या 10 गाड्या पकडल्या. त्यातील एक वाळुची गाडी रिकामी करून पळून गेला. 9 जणांना पकडून स्थानिक गुन्हा शाखेने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेतील सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शंकरराव शेकडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आज दि.12 जूनच्या रात्री स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष शेकडे, पोलीस अंमलदार सुरेश घुगे, तानाजी येळगे, मोतीराम पवार, शेख इजराईल, अकबर पठाण आदी भगवान बाबा चौक ते लातूर फाटा या रस्त्यावर पोहचले. 12 जूनच्या 3 वाजता त्यांनी त्या रस्त्यावर येणारी वाळुने भरलेली वाहने थांबवून चौकशी केली. त्यांनी ही वाळू मालकाच्या सांगण्यावरून मनगी या गोदावरी पात्रातून आणली होती. त्यांच्याकडे वाळु वाहतुकीची कोणतीही कागदपत्रे नव्हती. पकडलेल्या दहा गाड्यांचे क्रमांक आणि त्यांचे चालक पुढील प्रमाणे आहेत. गाडी क्रमांक एम.एच.20बीएफ 4716(चालक श्रीकांत हनमंतराव मोरे), गाडी क्रमांक एम.एच.17 बी वाय 2222(चालक सचिन प्रकाश —), गाडी क्रमांक एम.एच.26 सी.ए. 5501(चालक रत्नदिप पांडूरंग जोंधळे), गाडी क्रमांक एम.एच.26 बी.ई.1717(चालक सुनिल नागोराव ठाकुर), गाडी क्रमांक एम.एच.26 बी.ई.4306 (चालक अभिनंदन नरहरी गच्चे), गाडी क्रमांक एम.एच.26 बी.ई.2850(चालक माधव अशोक पसमे), गाडी क्रमांक एम.एच.43 यु.6376 (चालक संभाजी नामदेव किरकन), एम.एच.44-8251(चालक राहुल गणपती दुधमल), गाडी क्रमांक एम.एच.04 ई.एल.2021 (चालक नितीन उत्तम कदम), गाडी क्रमांक एम.एच.43 वाय 6559(चालक राजू मालु वाघमारे) असे आहेत. एकूण 6 हायवा गाड्या आणि 4 टिपर आण त्यात भरलेली 48 ब्रास वाळु असा एकूण 1 कोटी 6 लाख 10 हजारांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हा शाखेने पकडला आहे. या दहा गाड्यांमधील राजू मालु वाघमारे यास पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे आणल्यावर त्याने तेथेच आपल्या गाडीतील वाळु रिकामी करून पळुन गेला आहे. संतोष शेकडे यांच्या फिर्यादीप्रमाणे या गाड्यांचे चालक आणि मालकांविरुध्द त्यांची कलम 379, 34 भारतीय दंड संहिता सोबत महाराष्ट्र जमीन व महसुल अधिनियम 1966 च्या कलम 48 (7) आणि 48(8) प्रमाणे तक्रार दिली आहे. स्थानिक गुन्हा शाखेने जप्ती पंचनामा, पंचनाम्यात जमा मुद्देमाल आणि 9 सुस्थितीतील आरोपी नांदेड ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिले आहेत. नांदेड ग्रामीण पोलीसांनी त्या संदर्भाने गुन्हा दाखल केला आहे.
दोन वर्षापुर्वी वास्तव न्युज लाईव्हच्या बातम्यांवर नाराज होवून मध्यरात्री एका पान टपरीवर आमचा भाऊ तानाजी येळगे विरुध्द बातम्या लिहिणाऱ्या वास्तव न्युज लाईव्हच्या लोकांना गोळ्या घालू अशी वल्गना करणाऱ्या दोन जणांना वास्तव न्युज लाईव्हवर आदर करणाऱ्या काही युवकांनी विचारणा केली असता गोळ्या घालण्याची भाषा करणारे त्या ठिकाणावरून निघुन गेले होते. याची कारणे काय असतील हे आता लिहिण्याची गरज राहिलेली नाही. पण आज पकडलेल्या सहा हायवा आणि चार टिपर यांना पकडलेल्या पोलीस पथकामध्ये तानाजी येळगे सुध्दा आहे. आता सुध्दा तानाजी येळगेच्या भावांना जाग यायला हवी की, त्यांच्याच भावाने त्यांच्या गाड्या पकडलेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *