नांदेड(प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हा शाखेतील अधिकाऱ्यांनी एक गावठी पिस्तुल आणि दोन रिकाम्या मॅग्झीन जप्त करून एका युवकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
10 जून रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथक गस्त करत असतांना कापुस संशोधन केंद्राकडून केली मार्केटकडे जात असतांना या रस्त्यावर एक माणुस पिस्तुल बाळगुण आहे अणि त्याला विक्री करायची आहे अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडे, पोलीस उपनिरिक्षक हरजिंदरसिंघ चावला, पोलीस अंमलदार रुपेश दासरवाड, बालाजी तेलंग, साहेबराव कदम, अनिल बिरादार, मोतीराम पवार, राजू बोधगिरे, अकबर पठाण, शेख इजरायल, गजानन बेनवाड आदींनी राधेशाम पंजाबराव भालेराव (24) रा.सखोजीनगर यास ताब्यात घेवून त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन रिकाम्या मॅग्झीज असा 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे आदींनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाचे कौतुक केले आहे.