नांदेड-काही दिवसांपूर्वी काही कामा निमित्त वजीराबादला जाणे झाले. माझी अर्धांगिनी खरेदी करीता बाजारात गेली.मी माझी टु व्हीलर एका बाजूला उभी करून बाजारातील दृश्य पाहण्यात मग्न होतो. कारण वजीराबाद मध्ये पायी चलने ही म्हणजे आपला जीव धोक्यात घालण्यासारखे नेहमीच अशी परीस्थिती बनलेली असते.कारण एक तर रस्त्यांवरील लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी केलेले मोठ्या प्रमाणात अतिक्रमण, वाहतूकीची मग टु व्हीलर असो अथवा फोर व्हीलर वर्दळ, सोबत खरेदी साठी आलेले असंख्य ग्राहक त्या मध्ये ही महीलाची संख्या खुप. याच्या सोबत माझ्या सारखे नियम धाब्यावर बसवून रॉगं साईड ने जाऊन वेळ व पेट्रोल वाचवण्यासाठी प्रयत्नशील लोक. या मुळे रस्त्यावर चलने दुर्भर होऊन जाते.मी हे सर्व दृष पाहण्यात मग्न असताना अचानक एक फोर व्हीलर गाडी जिच्या वर अतिक्रमण पथक लिहिलेले होते. ती गाडी येताना दिसली. मला वाटले आता हे लोक अतिक्रमण बाजूला सारून वाट मोकळी करून देतील. म्हणून मी उत्सुकतेने त्या गाडी कडे पाहत होतो. परंतु तसे न्हता एक आश्चर्यकारक घटना पाहायला मिळाली. त्या गाडीत समोर एक अधिकारी असेल व मागे दोन तीन कर्मचारी असतील. ती गाडी इकडे तिकडे डोळेझाक करत एका अननस च्या गाड्या समोर थांबवून एक दोन कर्मचारी उतरून पांच सहा अननस उचलून गाडीत जाऊन बसले नंतर तो गाडे वाला गाडी जवळ गेल्यावर आपसात सेटलमेंट होऊन त्याला तीन अननस परत करण्यात आले.असेच पुढे ज्या फळांची अथवा अन्य पदार्थांची गरज असेल ते उचलून घेत होते. परंतु त्यांच्या लगत दुसऱ्या गाडीवाल्यानां रस्त्यावर उभे असताना ही काही ही त्रास देत नव्हते. हा त्यांचा मोठे पणा म्हणावं की आणखी काही समजत नाही.मी नंतर खुप विचार केल्यावर असे वाटले की महानगरपालिका ने अश्या प्रकारे फळे व अन्य पदार्थ जमा करण्या साठी एखादा वेगळा विभाग तयार करून हे सर्व वस्तू त्या अकाऊंट मध्ये जमा करत असतील अथवा यांचा उपयोग पाहुणचार करण्यासाठी करत असतील. परंतु नक्की काय समझले नाही!याच्या व्यतिरिक्त ” आली लहर केला कहर” या म्हणी प्रमाणे महानगरपालिका चे अतिक्रमण पथक केव्हाही प्रगट होते आणि रस्त्यावरील अतिक्रमणे केलेल्या व्यावसायिकाचें वाटेल त्या वस्तू उचलून घेऊन जातात. खुप लोक महापालिकेत जाऊन सामान परत घेऊन येत असतील परंतु याचा हीशेब कसा मिळत असावा देव जाणे कारण उचलताना काही ही नोंद केलेली नसते. परंतु हे सर्व करताना जे नेहमी करिता रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आहे ते या पथकाला दिसत नाही. परंतु यांच्या कडून अनेकदा गाडीत बसल्या बसल्या कुल्फी असो, वडापाव असो अथवा ज्युस किंवा अन्य पदार्थ मनसोक्त खाताना ह्या पथकातील सर्व जण दिसतात परंतु पैसे देताना नजरेत पडत नाही.महानगरपालिकेच्या अश्या अदभुत अतिक्रमण हटाव मोहीमें मुळे नांदेड चे रस्ते केव्हा अतिक्रमण मुक्त होऊन रहदारी कधी सुरळीत होईल हेच कळण्यास वाव नाही.सत्य परिस्थिती पाहून मनातील शंका दूर करण्याच्या उत्सुकते पोटी हे लिखान कराण्याच खटाटोप. तरीही कोणालाही कमी लेखण्याचा थवा त्रास देण्याचा मानस नाही.तरी पण कोणाचे मन दुखावले असल्यास क्षमस्व.
-राजेंद्र सिंघ नौनिहाल सिंघ शाहू इलेक्ट्रिकल ट्रैनंर आणि सामाजिक कार्यकर्ता अबचलनगर नांदेड 7700063999