शेतात काम करणाऱ्या महिलेचे दागिणे लुटले

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर तालुक्यातील बोरगाव शिवारात शेतात काम करणाऱ्या एका महिलेचे दागिणे बळजबरी चोरल्याचा प्रकार घडला आहे.
6 जून 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास संगीता सुरेश राजूरे या महिला आपल्या शेतात कणस वेचण्यासाठी गेल्या होत्या. त्या बिब्याच्या झाडाखाली बसल्या असतांना कोणी तरी तिच्या जवळ आले त्यांच्या गळ्यातील सोन्या-चांदीचे दागिणे 53 हजार रुपये किंमतीचे बळजबरीने चोरून नेले आहेत. देगलूर पेालीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 242/2024 नुसार दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक पवार अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *