नांदेड,(प्रतिनिधी)- शहरात खिचडी साठी प्रसिद्ध असलेल्या कविता हॉटेलमध्ये आज भीषण आग लागली आणि जवळपास हॉटेलमधील सर्व साहित्य जळून भस्म झाले आहे. एकूण किती नुकसान झाले आणि आग का लागली या संदर्भाची माहिती प्राप्त झाली नाही. अग्निशमन दलाने अत्यंत त्वरित प्रभावाने आग आटोक्यात आणली.
नांदेड शहरात बाफना टी पार्टी येथे कविता हॉटेल आहे. कविता हॉटेलमध्ये खिचडी, वेगवेगळ्या प्रकारचे भजे, चहा, कॉफी, दूध असे साहित्य ग्राहकांसाठी तयार असते. या हॉटेलमध्ये अनेक वेळेस खिचडी खाण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना लांब लचक वाट पाहावी लागते. तरी पण लोक या खिचडीच्या प्रेमात एवढे आहेत की तेथे उभे राहून आपली बारी येण्याची वाट पाहतात.
सध्या तापमान जास्त आहे.कविता हॉटेल ही पहिल्या मजल्यावर आहे. आणि आज दुपारी हॉटेलमध्ये अचानक आग लागली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु कविता हॉटेलमधील सर्व साहित्य आगीने खाक केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्वरित अग्निशमन दलाला बोलावले. अग्निशमन दलाने अत्यंत त्वरित प्रभावाने आग आटोक्यात आणली आह. हॉटेल मालकाचे किती नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळाली नाही. तसेच आग कशी लागली याची ही माहिती प्राप्त झाली नाही.
आज रोजी ुपारी 3 वाून 15 मिनिटांनी अग्निशमन दलास कविता खिचडी रेस्टॉरंट बाफना येथे आग लागल्याची माहिती मिळाली.
तात्काळ वाहन क्रमांक एम एच 26 सी एच 0486 सोबत सावळे, सुर्यवंशी, पंडित,गीते, वाहन चालक टारपे हे कविता रेस्टॉरंट बाफना येथे आग विझवण्यासाठी रवाना झाले.
तीन वाजून 22 मिनिटांनी आग विझवण्यास काम चालू केले असता आग ठीक तीन वाजून चाळीस मिनिटांनी पूर्णपणे आटोक्यात आली
आग लागली तेव्हा त्या ठिकाणी 14 कामगार काम करत होते , 16 टेबलवर लोक जेवायला बसलेले होते.
सदरील घटनेमध्ये इलेक्ट्रिक सॉकेट बोर्ड ,वायरिंग, कॅमेरे ,लाईट, प्लास्टिक मटरेल व किचन मध्ये आग लागली होती. सदरील आग ही गॅस गळती होऊन लागली असावी असा अंदाज मालक इस्रार खान 7900137612 यांनी व्यक्त केला व किती नुकसान झाले याचा माहिती समजू शकली नाही.
अग्निशमन अधिकारी श्री के एस दासरे यांच्या मार्गदर्शनाखाली आग विझवण्यात आली.