गोवर्धन कोळेकर यांना राष्ट्रपतीचे विरता पदक प्रदान

नांदेड(प्रतिनिधी)-2018 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या एका जातीय दंगलीत अत्यंत धिरोदात्तपणे लोकांचे जिव वाचविण्यात दाखवलेल्या शौर्यासाठी सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक गोवर्धन धनाजी कोळेकर यांना जाहीर झालेले राष्ट्रपती पदक महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी प्रदान केले.गोवर्धन कोळेकर अत्यंत नामांकित पोलीस अधिकारी आहेत. नांदेड जिल्ह्यात सुध्दा त्यांनी भरपूर कामगिरी केली आहे.
दि.15 ऑगस्ट 2021 रोजी भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी त्यावेळी देशातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर केले. त्यात एक नाव पोलीस उपअधिक्षक या पदावरून छत्रपती संभाजीनगर शहरातून सेवानिवृत्त झालेले गोवर्धन धनाजी कोळेकर यांचे नाव सुध्दा होते. त्यांनी सन 2018 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या एका जातीय दंगलीमध्ये स्वत:च्या जिवाची परवा न करता जनतेच्या रक्षणासाठी दाखवलेले शौर्य राम नाथ कोविंद यांनी मान्यता देत त्यांना विरता पदक प्रदान केले आहे.
काही कारणांनी बरेच राष्ट्रपती पद वाटप करण्यासाठी उशीर झालेला होता. त्याचा समारोह 6 जून रोजी मुंबईच्या राज्यपाल भवनात पार पडला. सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी गोवर्धन धनाजी कोळेकर यांना त्यांचे विरता पदक प्रदान केले. गोवर्धन कोेळेकर हे 1983 मध्ये पोलीस दलात भरती झाले होते आणि सन 2019 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपअधिक्षक असतांना सेवानिवृत्त झाले. सध्या गोवर्धन कोळेकर हे छत्रपती संभाजीनगर येथेच राहतात. गोवर्धन कोळेकर यांनी नांदेड जिल्ह्यात धर्माबाद, देगलूर या पोलीस ठाण्यासह इतरही अनेक पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक म्हणून कार्यभार सांभाळलेला होता. नांदेड जिल्ह्यात काम करतांना ते उत्कृष्ट अधिकारी म्हणून प्रसिध्द होते. आपल्या सेवाकाळात सुध्दा त्यांनी बरीच पदके मिळवली होती.

असे गाजवले शौर्य 

दिनांक 11 मे 2018 रोजी छत्रपती संभाजी नगर शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मोती कारंजा भागात दोन गटात दंगल उसळली. अत्यंत मोठा जमाव दोन्ही बाजूने जमला होता आणि एकमेकांवर दगडफेक करत होता. त्यावेळी गोवर्धन कोळेकर यांनी आपल्या जीवाची परवा न करता त्या दंगलीत शिरून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु जमावाने केलेल्या दगड फेकीतील एक दगड त्यांच्या गळ्यावर जोरदारपणे लागला. तरी आपल्या गळ्याला रुमाल बांधून कोळेकर यांनी त्यावेळी काम केले. पण त्यांना लागलेला दगड आणि त्यामुळे झालेली जखम एवढी भयंकर होती की त्यांना एअर ॲम्बुलन्सने मुंबई येथे उपचारासाठी पाठवण्यात आले होते. आपले कर्तव्य बजावताना मोठ्या जमावत घुसून शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात त्यांना लागलेल्या दगडामुळे त्यांचा आवाज कायमस्वरूपी बदलला आहे. तसेच त्यांचा डावा हात शक्तीहीन झाला आहे या शौर्याची दखल घेऊन त्यांना शौर्य पदक प्रदान करण्यात आले आहे नांदेड जिल्ह्यात सुद्धा गोवर्धन कोळेकर यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *