नांदेड(प्रतिनिधी)-चांडोळा ता.मुखेड येथे अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या दोन गटांमध्ये मोठा राडा झाला. एक दुसऱ्यावर धार-धार शस्त्रांनी वार करण्यात आले. त्या घटनेत तीन युवक गंभीर जखमी आहेत. माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार सुध्दा तिकडे गेले होते.
अवैध वाळु वाहतुक हा एक मोठा गंभीर प्रकार आजपर्यंत कोणीच रोखू शकला नाही. वाळु वाहतुक करण्याच्या वादातून चांडोळा येथे आज सकाळी दोन गटांमध्ये वाद झाला. त्यानंतर चार चाकी गाडीत आलेल्या काही जणांनी दुसऱ्या गटावर धार-धार शस्त्रे वापरुन हल्ला केला. या हल्यात दोन जणांची बोटे तुटल्याची माहिती सांगण्यात आली. एका युवकाच्या डोक्यात तलवारीने गंभीर जखम झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सुध्दा तयार झाला आणि तो व्हायरल झाला. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी त्वरीत दखल घेत अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांना चांडोळाकडे पाठविले. सोबतच देगलूरचे पोलीस उपअधिक्षक संकेत गोसावी सुध्दा तेथे आले. मुखेड पोलीसांनी घडलेल्या प्रकारानंतर जखमींना उपचारासाठी पाठविले आहे. अवैध वाळु उत्खनन हा नांदेड जिल्ह्यात एक मोठा प्रकार आहे. पण त्यार कोणीच पुर्णपणे नियंत्रण आणू शकत नाही. मी मोठा की, तु मोठा यातून हा वाद होता आणि अशा गंभीर घटना घडत आहेत. प्रशानाने त्वरीत प्रभावाने यावर लगाम लावण्याची आवश्यकता आहे. वृत्तलिहिपर्यंत चांडोळा प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हाता.
संबंधित व्हिडिओ..