नांदेड(प्रतिनिधी)-मागील महिन्यात नांदेडच्या तीन पोलीस उपनिरिक्षकांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यामध्ये कारण असलेल्या स्थानिक गुन्हा शाखेच्या एका पोलीस अंमलदाराची तैनाती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नियंत्रण कक्षात केली आहे.
मागील महिन्यात अगोदरच बदली झालेले पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे (बदलीचे ठिकाण लातूर जिल्हा) आणि दशरथ आडे (हिंगोली) यांना एका दिवशी अचानकच कार्यमुक्त करण्याचे आदेश झाले. 24 तासातच त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते. या कार्यमुक्तीमध्ये स्थानिक गुन्हा शाखेतील एक पोलीस अंमलदार सहभागी होता अशी चर्चा त्यावेळी झाली होती.
दि.1 जून 2024 रोजी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अंमलदार अफजल महेमुद खान पठाण (बकल नं.1210) याची तैनाती पोलीस अधिक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात केली. त्या आदेशाला संदर्भीत ठेवून स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांनी 2 जून रोजी मध्यानानंतर अफजल पठाण यांना स्टेशन डायरीमधील नोंद क्रमांक 14 प्रमाणे नियंत्रण कक्षात हजर होण्यासाठी कार्यमुक्त केले आहे.
म्हणतात ना इतरांसाठी खड्डे खोदणारे व्यक्ती स्वत:च त्या खड्डयात पडतात. त्यामुळे आपले पद, आपल्यातली क्षमता णि त्या क्षमतेच्या उपयोगाची गरज लक्षात घेवूनच प्रत्येकाने काम केले पाहिजे. नसता काही तरी नवीनच प्रसंग तयार होतो. असाच काहीसा प्रकार स्थानिक गुन्हा शाखेत झाला आहे.
अफज पठाण विरुध्द प्राथमिक चौकशी सुध्दा सुरू करण्यात आल्याची माहिती प्राप्त करण्यात आली आहे. चौकशीमध्ये आरोप काय आहेत. याचा मात्र सुगावा आज लागला नाही. स्थानिक गुन्हा शाखेत काम करतांना अफजल पठाण यांनी अनेक कामगिऱ्या केल्या आहेत. त्यातील कोणत्या तरी कामगिरीबद्दल ही चौकशी लागली असावी अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.