मनाली दामोदर संशोधनासाठी फान्सला जाणार

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील तरोडा नाका येथील मनाली गौतम दामोदर या महिलेच्या गर्भशयाच्या गंभीर आजाराचे अगदी सहज व सोप्या पध्दतीने निदान करण्यासाठी तिने जागतिक स्तरावर नाव लोकीक मिळवले. पुढील संशोधनासाठी ती फ्रान्समधील युनिव्हर्सिटी ऑफ बोर्डिटअक्स या लॅबने लिव्हर कॅन्सर याा संशोधनासाठी तिला निमंत्रीत केले आहे.
मुळ हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील असणारी मनाली हिचे इयत्ता 10 वी व 12 पर्यंतचे शिक्षक किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे पार पडले. आपली मोठी बहिणी डॉ.सांची दामोदर हिच्या मार्गदर्शनाखाली तिरुपती येथील पुढील शिक्षणासाठी तिने प्रवेश घेतला आणि जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर पाच वर्षात पदवी आणि पद्‌व्युत्तर परिक्षा उत्तीर्ण झाली. तिरुपती येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर येथे बॅचलर ऑफ सायन्स, मास्टर ऑफ सायन्स या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तसेच केवळ जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याची तयारीच्या जोरावर मनालीने गेल्या पाच वर्षांत पदवी आणि पदव्युत्तरची परीक्षा उतीर्ण केली. या अभ्यासक्रमाचा एक भाग असलेल्या प्रोजेक्टमध्ये महिला वर्गांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पीसीओएस या स्त्री रोगावर सोप्या पद्धतीने निदान करण्यासाठी स्वतःच्या कल्पकतेने तिने आपल्या टीमला संशोधन करण्याची डिटेक्शन किटची आयडिया दिली. खरेतर महिलांच्या गर्भाशयातील पीसीओएस गंभिर आजाराचे निदान आजघडीला सोनोग्राफी आणि काही हार्मोन्स टेस्टिंगच्या मदतीने हा आजार कन्फर्म करता येतो. परंतु त्यामध्ये शंभर टक्के रिझल्ट मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारे महिलांच्या गंभिर मोठ्या जीवघेण्या आणि तेवढ्याच चिंताजनक समजल्या जाणाऱ्या या आजाराचे सहज आणि सोप्या पद्धतीने निदान करण्यासाठी मनाली दामोधर हिने आपल्या टीमला डिटेक्शन किटची आयडिया दिली. तसेच टीममधील सर्वांना ती आवडल्यामुळे लगेच त्यांनी त्यावर सातत्याने अभ्यासपूर्ण संशोधन करून हा प्रयोग यशस्वी केला. रुग्ण महिलेच्या रक्ताचे सॅंपल घेवून त्यावर टेस्टिंग प्रकिया करून या स्त्री रोगाचे निदान करणारे जगभरातील यावरील हे पहीले संशोधन ठरले आहे. विशेष म्हणजे टीममधील सर्वांच्या अथक परिश्रमामुळे हा प्रयोग यशस्वी ठरला असून जागतिक स्तरावरील स्पर्धेत तो बक्षीस पात्र ठरला आहे. फ्रान्स देशातील पॅरिस या शहरात गतवर्षी घेण्यात आलेल्या नवोदित
संशोधकांसाठीच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत तिरुपती येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर यांच्या टीमने उल्लेखनीय कामगिरी केली असून त्याठिकाणी त्यांनी सादर केलेल्या डिटेक्शन किट या संशोधनास सुवर्ण पदक मिळाले आहे. या टीममध्ये नांदेडच्या मनाली दामोदर या तरुण सायंटिस्ट भीम कन्येचा समावेश असून तिच्या या अदभुत यश आणि चमकदार कामगिरी बद्दल समाजाच्या सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *