बिलोली, कंधार आणि इस्लापूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चार चोऱ्या; 2 लाख 96 हजार 800 रुपयांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे दिग्रस ता. कंधार येथे एक घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 68 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. मौजे बाभळी ता.बिलोली येथे एका बंद घर फोडून चोरट्यांनी त्यातून 1 लाख 99 हजारांचा ऐवज चोरला आहे. मौजे ईस्लापूर येथे दोन घरात चोरी करून चोरट्यांनी 61 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे.
सरकारी कार्यालयात कोतवाल असलेले शेख जिलानी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 जूनच्या रात्री 11.30 ते 4 जूनच्या पहाटे 5 वाजेदरम्यान त्यांच्या घराच्या मेनगेटला लावलेले कुलूप तोडून चोरट्यांनी कपाट फोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 3 लाख 68 हजारांचा ऐवज चोरून नेेला आहे. कंधार पोलीसांनी हा प्रकार गुन्हा  क्रमांक 177/2024 नुसार दाखल केला. गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार श्रीरामे हे करीत आहेत.
बाभळी ता.बिलोली सुधाकर गंगाधर देशमुख हे आपल्या कुटूंबियासह बहिणीच्या गावी बिलोली येथे गेले असतांना त्यांचे बंद असलेले घर चोरट्यांनी फोडले. या घरातील कपाटात ठेवलेले 90 हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिणे असा 1 लाख 99 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. बिलोली पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 87/2024 नुसार दखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक डी.बी.मुंडे अधिक तपास करीत आहेत.
ईस्लापूर येथील हॉटेल व्यावसायीक आशिष सत्यनारायण जयस्वाल  यांचे घर दि.3 जूनच्या सायंकाळी 7 ते  4 जूनच्या पहाटे 4 वाजे दरम्यान फोडले आणि त्यांच्या घरातील 50 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. तसेच जयस्वालचे शेजारी माधव मोतेवार यांच्या घरात चोरी करून चोरट्यांनी त्यांच्या घरातील 11 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. या दोन घटनांचा गुन्हा ईस्लापूर पोलीसांनी क्रमांक 52/2024 नुसार दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक मुंडे हे करीत आहेत असे प्रेसनोटमध्ये लिहले आहे. पण पोलीस जनसंपर्क विभागाने टायपिंग करतांना हि चुक केेलेली आहे. पोलीस उपनिरिक्षक मुंडे हे बिलोलीला कार्यरत आहेत. कॉपी पेस्ट करून माहिती तयार करतांना ही चुक घडलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *