कर्नाटकच्या बसने बिलोली आगाराच्या बसला ठोकले; देगलूरच्या लेंडी नदीजवळील वळणावरील घटना 

बिलोली आगाराचा चालक जखमी;दोन तासानंतर वाहतूक सुरळीत 
देगलूर ( प्रतिनिधि)- नांदेडहून देगलूर मार्गे बिदर कडे जाणाऱ्या बिदर आगाराच्या बसने समोरून येणाऱ्या बिलोली आगाराच्या बसला  ठोकले. यात बिलोली आगाराचा बस चालक गंभीर जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आलेले आहे.  बसचा समोरचा भाग अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सदरील घटना देगलूरच्या लेंडीनदी पुलाच्या वळणावर बुधवार दि. 5 जून रोजी दुपारी अडीचच्या सुमारास  घडली. या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
     बिलोली आगाराची बस (क्रमांक MH 14 BT 1780) ही देगलूरहून बिलोलीकडे जात होती. ही बस लेंडी नदीचे पूल ओलांडून वळणावर असतानाच नांदेडहून बीदर कडे जाणाऱ्या कर्नाटक आगाराच्या बसने ( क्रमांक KA 38 F 1013) बिलोली आगाराच्या बसला ठोकले. यात बसचा समोरील भाग चक्काचूर झाला. दरम्यान  खानापूर फाट्यावरून देगलूरकडे येणाऱ्या पोलीसांनी बसचालकास नागरिकांच्या सहाय्याने बस बाहेर काढून उपजिल्हारुग्णालयात दाखल केले. या अपघातात बिलोली आगाराचा बसचालक राहुल मल्लारी हादगले यांच्या दोन्ही पायाला व दोन्ही हाताला गंभीर दुखापत झाली.  अपघात स्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे, माधव मरगेवार, राहुल महाजन, भिसे, सुधाकर मलदवडे, जगताप आदिनी जखमींना उपचाराचा नेण्यासाठी प्रयत्न केले.
आगार व्यवस्थापक तात्काळ घटनास्थळी तळ ठोकून
सदरील अपघाताची माहिती एका जागरूक पत्रकाराने आभार व्यवस्थापक संजय आकुलवार यांना भ्रमणध्वनीवरून देतात तात्काळ येथे घटनास्थळी दाखल होऊन  दोन तास तळ ठोकून जखमी वाहन चालक व प्रवाशांना उपचारासाठी इतरत्र हरविले व वाहतुकीची कोंडी सोडवण्यास तत्परता दाखवली.
दीड ते दोन तासाने वाहतूक सुरळीत 
लेंडी नदीच्या पुला जवळील वळणावर बिदर आगाराच्या बसने बिलोली आगाराच्या बसला ठोकले. हा अपघात वळणावर घडल्यामुळे बराच काळ नांदेड हैदराबाद महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या परिणामी वाहतुकीची कोंडी झाली होती. ट्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त बसला बाजूला काढल्यानंतरच दीड ते दोन तासाने वाहतूक सुरळीत झाली. 
 जखमी प्रवाशांना येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल. 
  या अपघातात  बसमधील प्रवाशी नागमणी काशीराम कोंडावार रा. बिचकुंदा, शितल घाळप्पा गङीवाळ रा. बिदर, लक्ष्मण मष्णाजी कल्लेवाड रा. हिंगणी बिलोली, मष्णाजी बत्तलवार रा. खानापूर, वनिता सुर्यकांत कांबळे, घाळप्पा चंद्रकांत मङीवाळ रा. बिदर, विनय घाळप्पा मङीवाळ, अरुणा प्रताप राके रा. लोहगाव या प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपजिल्हारुग्णालयात उपचार चालू आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *