नांदेड(प्रतिनिधी)-फायनान्सच्या कर्जासंदर्भाने जिल्ह्यातील उस्माननगर, नायगाव आणि उमरी या ठिकाणी तिन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.
वाका ता.लोहा येथील जनाबाई पंडीत हंबर्डे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मागील एक वर्षात त्यांना आणि इतरांना कर्ज देतो असे म्हणून प्रत्येकाकडून 32 हजार 750 रुपये असे एकूण 2 लाख 94 हजार 750 रुपये घेतले. कोणतेही कर्ज न देता 5 हजार रुपये किंमतीचे बनावट मुद्रांक तयार करून त्यांची आणि इतरांची फसवणूक केली आहे. उस्माननगर पोलीसांनी या संदर्भाने गुन्हा क्रमांक 91/2024 दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक गाडेकर हे करीत आहेत.
शाहीन बी रसुल साब शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नायगाव येथे 22 फेबु्रवारी 2024 ते 9 मार्च 2024 दरम्यान आरोपींनी त्यांना टीव्हीएस कंपनीचे फायनान्स करून दिले होते. त्यानंतर रसुल बी ने फायनान्सचे सर्व पैसे भरले पण त्यानंतर यांची परवानगी न घेता टीव्हीएस कंपनीकडून रसुल बी चे वडील आणि त्यंाच्या मुलांच्या कागदपत्रांचा दुरूपयोग करून स्वत:च 1 लाख 85 हजार 999 रुयांचे कर्ज ेतले. नायगाव पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 122/2024 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक बनसोडे करीत आहेत.
उत्तम पांडूरंग जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन 2023 मध्ये श्रीराम फायनान्सकडून 1 लाख 77 हजार 500 रुपयांचे कर्ज घेवून दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.14 एफ.सी.5201 खरेदी केली. श्रीराम फायनान्सचे कर्ज एकूण 56 हप्ते परतफेड करण्याच्या अटीवर 100 रुपयांच्या मुद्रांक कागदावर विक्री नामा करून ही दुचाकी खरेदी केली होती.29 जुलै 2023 रोजी 1 लाख रुपये आणि उर्वरीत 77 हजार 500 रुपये साक्षीदारांसमक्ष दिले. गाडीचे पैसे परतफेडीसाठी आरोपीच्या खात्यावर पैसे टाकले. परंतू गाडीची रक्कम न भरता ते त्यांनी स्वत: वापरून फसवणूक केली आहे. उमरी पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 170/2024 प्रमाणे दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक शेवले हे करीत आहेत.