कंधार शहरातील भक्ती मेडीकलला शॉर्ट सर्किटमुळे आग; 50 लाखांचे नुसान

कंधार(प्रतिनिधी)-शहरातील भवानी नगर कमानी समोर असलेल्या होलसेल व रिटेल असलेल्या भक्ती मेडीकलला दि.2 रोजी सकाळी आठ वाजेदरम्यान आग लागली.आग कशामुळे लागली हे स्पष्ट नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे.लागलेली आग तब्बल पावणे दोन तासाच्या अथक परिश्रमाने आटोक्यात आली.या आगीत मेडीकल मधील सुमारे 50 लाख रुपयाचे सामान जळुन खाक झाले.वेळेत आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.
कंधार शहरात भवानी नगर कमानी समोर अमोल यदुराज गबाळे यांचे रिटेल तर आशिष संजय गबाळे यांचे होलसेल असे दोन्ही मेडीकल स्टोअर्स एकाच ठिकाणी दोन मजली दुकान होते लगतच उजव्या बाजूला ऐश्वर्या साडी सेंटर आहे.ऐश्वर्या साडी सेंटरचेही यामध्ये नुकसान झाले आहे.सकाळी 8 वाजेच्या सुमारास इनव्हर्टरची बॅटरी किंवा फ्रिजच्या शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली असावी अशी माहिती अमोल गबाळे यांनी दिली.सदर आग लागल्याची माहिती अमोल यांना ध्रुव मेहता यांनी फोनवरून दिली.घटनास्थळी भक्ती मेडीकलचे अमोल उबाळे आल्यानंतर पाण्याचे खाजगी टॅंकरच्या सहाय्याने मेडीकल स्टोअर्सचीआग विझविली.एक तासानंतर आलेल्या नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने वरच्या मजल्यावरील आग विझविण्याचा प्रयत्न केला.परंतू आग आटोक्यात आली नाही.शेवटी लोहा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण करुन आगीवर नियंत्रण मिळविले.सदर आग विझविण्यात पोलिस दलाने महत्वाची भुमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *