नांदेड(प्रतिनिधी)-बनावट लोगो वापरून खोटा सूर्यछाप जर्दा विकणाऱ्या दोन जणांविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बाबुलाल गंगासरण अग्रवाल हे नांदेड जिल्ह्यात व्ही.एच.पटेल या तंखाबु कंपनीचे डिलर आहेत. त्यांची कंपनी चाळीसगाव येथे आहे आणि ती सुर्यछाप तोटा बनवते. दि.31 मे रोजी दुपारी महेबुबीया कॉलनीमध्ये त्यांनी पोलीसांसोबत छापा टाकला असता त्या ठिकाणी अफरोज खान गुलाब खान पठाण आणि इमरान खान मौला खान यांच्या घरात बनावट सुर्यछाप तोटयाचा 1 लाख 14 हजार 800 रुपयांचा साठा सापडला. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 468, 471 प्रमाणे गुन्हा क्रमांक 430/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे यांच्याकडे देण्यात आला आहे. महेश कोरे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी पकडलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.